मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिणवाहिनी मार्गिकेचे लोकार्पण सोमवारी ११ मार्चला झाल्या नंतर ही मार्गिका १२ मार्च पासून अंशतः खुली होणार आहे. मात्र, या प्रकल्पातील या एका मार्गिकेचा वापर शनिवार आणि रविवारी बंद असेल. आठवड्याचे पाच दिवस अर्थात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत या मार्गावरून वाहतूक करता येणार आहे.प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टिने वाहतुकीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Coastal Road)
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis), उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार (Ajit pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी ११ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता खुली करण्यात येणार आल्यानंतर मंगळवारी १२ मार्च पासून या मार्गावरून वाहतूक करता येणार आहे. (Coastal Road)
खुल्या होणाऱ्या मार्गिकेवरुन कधी प्रवास करू शकता…
किनारी रस्त्याची वरळी ते मरीन ड्राइव्ह ही मार्गिका आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वाहतुकीसाठी सुरु असेल. तर शनिवार आणि रविवारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल. याचे मुख्य कारण म्हणजे किनारी रस्त्यावरुन उत्तरेकडे जाणाऱ्या बाजुची कामे व इतरही कामे सध्या सुरु आहेत. त्यादृष्टिने प्रकल्पाची कामे सुरु रहावीत, उर्वरित प्रकल्प देखील वेळेत पूर्ण करता यावा, यासाठी वाहतुकीच्या वेळा ठरवण्यात आल्या आहेत. ऐन वर्दळीच्या वेळेत (पीक अवर्स) वाहतूक सुरु राहील, नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. (Coastal Road)
(हेही वाचा- जगातील श्रीमंत लोकांपैकी एक दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वृत्तपत्रांचे मालक Keith Rupert Murdoch)
ही बाब लक्षात घेता, किनारी रस्त्याची वरळी ते मरीन ड्राइव्ह मार्गिका सोमवार ११ मार्च २०२४ रोजी समारंभपूर्वक खुली करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष, मंगळवार, दिनांक १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून या ठरवलेल्या वेळापत्रकानुसार मुंबईकरांना या मार्गिकेवरुन प्रवास करता येईल. (Coastal Road)
असा आहे संपूर्ण प्रकल्प-
एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी जवळपास १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. तसेच अमरसन्स, हाजी अली व वरळी येथे आंतरबदल मार्गिका अर्थात इंटरचेंज आहेत. (Coastal Road)
जुळे बोगदे ठरणार आकर्षण
दक्षिण-उत्तर मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी २ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे करण्यात आले आहेत. या बोगद्यात सहा व इतर ठिकाणी ८ मार्गिका आहेत. त्यासाठी, सुमारे चार मजली इमारतीइतकी उंची, १२.१९ मीटर व्यास, ८ मीटर लांबी व तब्बल २८०० टन वजनाच्या ‘मावळा’ या भारतातील सर्वात मोठ्या टीबीएम संयंत्राचा उपयोग करण्यात आला. या बोगद्यांना तब्बल ३७५ मिमी जाडीचे काँक्रिटचे अस्तर आहे. त्यावर अग्नीप्रतिबंधक उपाययोजना म्हणून अत्याधुनिक फायरबोर्ड लावले आहेत. या बोगद़यांमध्ये भारतात प्रथमच वापरात येत असलेली अत्याधुनिक सकार्डो ही वायूविजन प्रणाली आहे. आपत्कालीन उपाययोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदे देखील आहेत. (Coastal Road)
इंधन, वेळेची कशी होणार बचत
किनारी रस्ता हा केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे तर पर्यावरणदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण वाहतूक कोंडी कमी होवून सुरक्षित प्रवासाचा वेग वाढेल. यातून वेळेची अंदाजे ७० टक्के बचत होईल. इंधनाची ३४ टक्के बचत होईल, पर्यायाने विदेशी चलनाचीही मोठी बचत तर होईलच, त्यासमवेत वायू प्रदूषणात घट होईल. (Coastal Road)
तब्बल ७० हेक्टर हरितक्षेत्राची निर्मिती
या प्रकल्पातून ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मिती केली जात आहे. हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक (Cycle tracks), सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक (Jogging tracks), खुले प्रेक्षागृह (Open Theatre) साकारेल. या प्रकल्पामुळे समुद्र किनारी अतिरिक्त विहार क्षेत्र उपलब्ध होईल. त्याची कामे देखील पूर्णत्वाकडे येत आहेत. सागरी तटरक्षक भिंतीमुळे किना-याची धूप होण्यापासून संरक्षण होईल. तसेच वादळी लाटा व पुरापासून देखील संरक्षण होईल. (Coastal Road)
बाधित मच्छिमारांसाठी कशी घेतली विशेष काळजी
किनारी रस्ता प्रकल्पामुळे बाधित मच्छिमारांचे नुकसान होऊन नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मच्छिमार पुनर्वसन मुल्यांकन समिती, योग्य नुकसान भरपाई, तसेच त्यांच्या मागणीनुसार समुद्रातील खांबांमधील अंतरात वाढ अशा सर्वंकष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (Coastal Road)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community