Coastal Road Project म्हणजे राजकीय आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्त्तीचे प्रतिक

माजी महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी स्पष्ट केले विचार

1013
Coastal Road Project म्हणजे राजकीय आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्त्तीचे प्रतिक

जेव्हा राजकीय आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती एक होते, तेव्हा कोणतेही काम चांगले होते आणि त्याचे उदाहरण म्हणजे मुंबई सागरी किनारी रस्ता अर्थात कोस्टल रोड (Coastal Road Project) असल्याचे माजी महापालिका आयुक्त तथा निवृत्त सनदी अधिकारी सुबोध कुमार यांनी स्पष्ट केले. कोस्टल रोड प्रकल्पाची संकल्पना मांडून जेव्हा याचा अभ्यास अहवाल तयार केला होता, तेव्हा तो प्रत्यक्षात साकारेल का अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु या प्रकल्पांना विलंब होऊ शकेल, पण रद्द होणार नाही असा पूर्ण विश्वास मला होता असेही सुबोधकुमार यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित सन २०१२मधील तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष व सदस्यांच्या सत्कार समारंभात बोलतांना सांगितले. (Coastal Road Project)

कोस्टल रोड प्रकल्पाची (Coastal Road Project) संकल्पना मांडून महापालिकेच्यावतीने याचा अहवाल तत्कालिन सरकारला सादर केल्यानंतर सन २०१२-१३च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. या तत्कालिन स्थायी समितीच्या बैठकीत याला मान्यता देऊन आर्थिक तरतूद करण्यात आली होती आणि या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष, समिती सदस्य, आयुक्त तसेच अतिरिक्त आदींचे आभार व सत्कार समारंभ महापालिका मुख्यालयातील सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात सर्वच पक्षांचे तत्कालिन सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेले सदस्य विठ्ठल खटरमोल, दिलीप पटेल, प्रविण छेडा, संदीप देशपांडे, धनंजय पिसाळ, जोत्स्ना दिघे, तृष्णा विश्वासराव, सुनील मोरे, शितल अशोक म्हात्रे, सिराज शेख तसेच तत्कालिन आयुक्त सुबोध कुमार हे उपस्थित होते. यासर्वांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. याप्रसंगी सहआयुक्त सुधाकर शिंदे, सहआयुक्त मिलिन सावंत, उपायुक्त चक्रधर कांडलकर, महापालिका सचिव संगीता शर्मा आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. (Coastal Road Project)

याप्रसंगी बोलतांना सुबोध कुमार यांनी कोस्टल रोडच्या (Coastal Road Project) मूळ संकल्पनेपासून तसेच शासनाला सादर केलेल्या अहवालापासून ते यासाठी उपलब्ध करून दिलेल्या फंजिबल एफएसआयमधील निधीबाबच्या प्रयत्नांची माहिती दिली. पर्यावरणाबाबतच्या अहवालानंतर तत्कालिन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश हे मुंबईत आले होते, त्यांना मुंबईकरांना समुद्र किनारी रस्ता (Coastal Road Project) बांधण्याची संकल्पना मांडली होती, परंतु त्यांनी समुद्रात भराव टाकून रस्ता बांधण्यास परवानगी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात भूमिका मांडून हा प्रकल्प मुंबईकरांसाठी कशाप्रकारे योग्य आहे याची खात्री पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती बनली आणि अभ्यास अहवाल तयार करून शासनाला पाठवल्यानंतर महापालिकेच्या अर्थसंकल्पात या या प्रकल्पाचा समावेश केला असल्याचे सुबोध कुमार यांनी स्पष्ट केले. तसेच विकास नियमावलीत बदल करून फंजिबल एफएसआयची आकारणी करून त्यातून मिळणारा पैसा कोस्टल रोड सह इतर प्रकल्प कामांसाठी वापरण्याचे नियोजन केले, असेही सांगितले. (Coastal Road Project)

(हेही वाचा – Maharashtra Temple Federation: महाराष्ट्रातील ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू, महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती)

राहुल शेवाळेंना महापौर असल्यासारखे वाटले

तब्बल दहा वर्षांपूर्वी नगरसेवक असलेले राहुल शेवाळे खासदार बनून संसदेत गेले. परंतु नगरसेवक असल्याने संसदेच्या कामकाजात भाग घेताना कधीही भीती वाटली नाही. तर महापालिकेतील अनुभवाचा फायदा संसदेत झाला,असे सांगत अनेक वर्षांनी आपल्या शाळेतील कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या माजी विद्यार्थ्याला जो आनंद होतो, तोच आनंद आज महापालिकेतील या सभागृहातील कार्यक्रमात सहभागी होताना होत आहे,असे खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले. (Coastal Road Project)

महापालिका सभागृहात नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष असताना खालच्या बाकड्यावर बसायचो. पण आज अध्यक्ष म्हणून महापौरांच्या खुर्चीच्या जागी बसलो. त्यामुळे या जागेवर बसून काम करतानाचा आनंद काय असतो हे आज मला कळाले. एक क्षण मला महापौर झाल्यासारखेच वाटले असे शेवाळे यांनी सांगत महापालिकेच्या शाळेतील अनुभव हा खूप मोठा आहे आणि त्याचाच फायदा मल झाल्याचे अभिमानाने सांगितले. मात्र, हा कार्यक्रम त्या क्षणाची पुनर्रावृत्ती करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच त्या क्षणाची आठवण करून देण्यासाठीच आयोजित केला होता, असेही शेवाळे यांनी स्पष्ट केले. (Coastal Road Project)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.