Coastal Road Project : कोस्टल रोडच्या अर्धवट प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील?

कोस्टल रोड प्रकल्पातील ती एक मार्गिका होईल का २८ फेब्रुवारीला खुली 

1114
Coastal Road Project अंशत: खुला, पण माजी महापालिका आयुक्त सुबोध कुमारांचा पडला महापालिकेला विसर
मुंबई महापालिकेचा सर्वांत मोठा प्रकल्प असलेल्या मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्प (Coastal Road Project) अर्थात मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने १९ फेब्रुवारीला होणाऱ्या या मार्गाचे लोकार्पण आता २८ फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, कोस्टल रोड प्रकल्प हा मे २०२४ मध्ये पूर्ण होणार असून या अर्धवट प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान करतील का याबाबत साशंकता वर्तवली जात आहे. त्यामुळे या एका मार्गीकेचे लोकार्पण राज्याच्या मुख्मंत्र्यांच्या हस्ते करायला लावून मे महिन्यात नवीन सरकारमध्ये पुन्हा पंतप्रधान बनून नरेंद्र मोदी या प्रकल्पाचे लोकार्पण करतील असे राजकीय जाणकारांचे आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Coastal Road Project)

लोकार्पण सोहळा पुढे ढकलला गेला

सुमारे १३, ५०० कोटी रुपयांच्या या कोस्टल रोड प्रकल्पाचे (Coastal Road Project) काम ८४ टक्के  पूर्ण  झाले आहे. त्यामुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह या १०.०८ किलोमीटर लांबीची एक मार्गिका १९ फेब्रुवारीला देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल अशी घोषणा महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना जाहीर केले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा दौरा रद्द  झाल्याने लोकार्पण सोहळा पुढे ढकलला गेला. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २८ फेब्रुवारीची तारीख उपलब्ध होत असल्याने महापालिकेच्या माध्यमातुन कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड जोड मार्गातील भुयारी कामाचे भूमिपूजन आणि महिला सक्षमीकरण दृष्टिकोनातून महिलांना शिवण यंत्र, घर घंटी, मसाला कांडप आदींचे वाटप करण्याचा कार्यक्रम केला जाणार आहे. (Coastal Road Project)

(हेही वाचा – AI in Bengaluru Metro : बेंगळुरू मेट्रोमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर)

पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण व्हावे हीच इच्छा…
मात्र, अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित तारीख आणि वेळ कळवण्यात आली नसून त्यामुळे महापालिका प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी करून ठेवली आहे. कोस्टल रोडच्या (Coastal Road Project) एका मार्गीकेचे काम पूर्ण झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची प्रचंड इच्छा आहे की या प्रकल्पातील एक मार्गीकेचे लोकार्पण हे देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे. पण भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांसह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान हे कधीही अर्धवट (Coastal Road Project) प्रकल्पाचे लोकार्पण करत नाहीत. त्यामुळे जरी ते आले तरी या प्रकल्पाचे लोकार्पण आपल्या हस्ते करणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार याचे लोकार्पण हे मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच केले जाण्याची शक्यता आहे. (Coastal Road Project)
पंतप्रधानांनी कधीही अर्धवट प्रकल्पाचे लोकार्पण केले नाही…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा मानस असला तरी अर्धवट (Coastal Road Project) प्रकल्प असताना त्याचे लोकार्पण केल्यानंतर जर काही घडल्यास त्याचे परिणाम थेट पर्यंत जाणवतात. त्यामुळे आपल्या पदाचा मान राखत त्यांनी पंतप्रधान यांनी कधीही अर्धवट प्रकल्पाचे लोकार्पण केले नाही आणि कोस्टल रोड प्रकल्पाचे लोकार्पण मोदी करणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Coastal Road Project)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.