मुंबई महापालिकेचा सर्वांत मोठा प्रकल्प असलेल्या मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्प (Coastal Road Project) अर्थात मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने याचे लोकार्पण सोमवारी ११ फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार होते. परंतु आजवर तीन वेळा काढलेला मुहूर्त पुढे ढकलण्यात आला होता. अखेर सोमवारचा चौथा मुहूर्त काढला असून सोमवारी तरी याचे लोकार्पण होईल ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकल्पाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते होणार नसून राज्याच्या मुख्मंत्र्यांच्या होईल असे वृत्त १० दिवसांपूर्वीच ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने दिले होते. अखेर हे वृत्त खरे ठरले आहे.
(हेही वाचा – Coastal Road Project : कोस्टल रोडच्या अर्धवट प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील?)
याठिकाणी होणार कार्यक्रम
मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी आणि मुंबईकरांसह संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी ११ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता खुली करण्यात येणार आहे. वरळी सी फेस परिसरातील बिंदू माधव ठाकरे चौक, खान अब्दुल गफार खान मार्ग येथून किनारी रस्त्यावर प्रवेशासाठी मार्गिका आहे, त्या ठिकाणी हा समारंभ होणार आहे.
हे मान्यवर निमंत्रित
या सोहळ्याप्रसंगी मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दक्षिणेकडे जाणारी मार्गिका आता खुली
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दक्षिण-उत्तर पसरलेल्या मुंबईभर रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे असले तरी वाढती लोकसंख्या आणि त्यातून वाढलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा अनुभव येतो. या कोंडीतून सुटका व्हावी तसेच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत व्हावी म्हणून महानगरपालिकेने मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉइंटपासून दहिसर-विरारपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणजे मुंबईच्या दक्षिणेला प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा मार्ग अर्थातच मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) होय. या प्रकल्पाची वरळीकडून मरीन ड्राइव्हच्या दिशेने म्हणजेच दक्षिणेकडे जाणारी मार्गिका आता खुली करण्यात येणार आहे.
हिंदुस्थान पोस्टने असे केले होते भाकीत
या प्रकल्पातील एक मार्गिकेचे लोकार्पण १९ फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी घोषित केले होते. त्यानंतर ही तारीख रद्द करून याचे लोकार्पण २८ फेब्रुवारीला पंतप्रधान यांच्या हस्ते होईल असे जाहीर केले. पण त्यावेळी हिंदुस्थान पोस्ट ने कोस्टल रोडच्या (Coastal Road Project) अर्धवट प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान करतील? या शीर्षकाखाली २३ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित करून याबाबत साशंकता वर्तवली होती. आणि या एका मार्गीकेचे लोकार्पण राज्याच्या मुख्मंत्र्यांच्या हस्ते करायला लावून मे महिन्यात नवीन सरकारमध्ये पुन्हा पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी ये या प्रकल्पाचे लोकार्पण करतील असे राजकीय जाणकार आणि अधिकाऱ्यांच्या हवाल्याने बातमी प्रकाशित केली होती. आज हे वृत्त खरे ठरत आहे.
पंतप्रधान यांनी कधीही अर्धवट प्रकल्पाचे लोकार्पण केले नाही…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्री यांचा मानस असला तरी अर्धवट (Coastal Road Project) प्रकल्प असताना त्याचे लोकार्पण केल्यानंतर जर काही घडल्यास त्याचे परिणाम थेट पर्यंत जाणवतात. त्यामुळे आपल्या पदाचा मान राखत त्यांनी पंतप्रधान यांनी कधीही अर्धवट प्रकल्पाचे लोकार्पण केले नाही आणि कोस्टल रोड प्रकल्पाचे लोकार्पण मोदी करणार नाहीत अशी शक्यता हिंदुस्थान पोस्टने वर्तवली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community