Coastal Road : वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोडसाठी हे असे नेमले कंत्राटदार

मुंबई महापालिकेच्या वतीने प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यानच्या मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड)शेवटच्या टप्प्यात असून आता वर्सोवा ते दहिसर आणि पुढे मिरा रोड भाईंदर या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यात वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोड प्रकल्पाचे सहा टप्यात काम हाती घेत कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.

4326
Coastal Road Project : कोस्टल रोडच्या प्रकल्पाचे लोकार्पण अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
Coastal Road Project : कोस्टल रोडच्या प्रकल्पाचे लोकार्पण अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या वतीने प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यानच्या मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प (Coastal Road) शेवटच्या टप्प्यात असून आता वर्सोवा ते दहिसर आणि पुढे मिरा रोड भाईंदर या कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यात वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पाचे सहा टप्यात काम हाती घेत कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या सहा टप्प्यातील कामासाठीच जीएसटीसह १८,२६९.७७कोटी रुपये आणि विविध करासह ही रक्कम ३६,०९५.१९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. (Coastal Road)

वांद्रे ते वर्सोवा दरम्यान समुद्रीमार्गे सी लिंक प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम .एस. आर. डी. सी.) यांच्या मार्फत केले जात असून ते सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे पुढील अर्थात वर्सोवा ते कांदिवली दरम्यान प्रस्तावित किनारी मार्ग (Coastal Road) म्हणून दर्शविण्यात आला. पण प्रकल्पाची मार्गरेषा वर्सोवा ते मालाड दरम्यान मंजुर विकास नियोजन आराखड्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या प्रस्तावित किनारी मार्गाशी जुळवून पुढे मालाड पासुन दहिसर पर्यंत सल्लागारांनी नविन मार्गरेषा सुचविली आहे. या प्रकल्पाची मार्गरेषा तसेच मालाड माईन्ड स्पेस ते गोरेगांव-मुलूंड जोडरस्ता यांना जोडणारा कनेक्टर याचा ही समावेश आहे. (Coastal Road)

वर्सोवा नाना-नानी पार्क ते दहिसर-मीरा भाईंदर जोड रस्ता असे या प्रकल्पाचे सहा पॅकेजमध्ये विभागून काम केले जाणार आहे. त्यातील चार भागातील कामे ही उन्नत मार्ग तथा पूल स्वरूपात आहेत व दोन टप्प्यातील कामे ही बोगदा अर्थात भुयारी मार्ग स्वरूपात आहेत. मेसर्स टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि. यांची या कामासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत मार्गरेषेने बाधित होणारी जमिन ही कांदळवन, खाडी व नैसर्गिक क्षेत्र तसेच अस्तित्वातील रस्त्यामधुन जाते. मेट्रो कारशेडवरून्ही हा प्रकल्प जात असून सहा पॅकेज मध्ये विभागून काढलेल्या या निविदेत सहा स्वतंत्र कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी जीएसटी सह १८,२६९.७७कोटी रुपये आणि विविध करासह ही रक्कम ३६,०९५.१९ कोटी रुपये एवढी आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च हा ३५९५५.०७ कोटी रुपये एवढा होता. पावसाळ्यासहित ४८ महिन्याच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. (Coastal Road)

(हेही वाचा – ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर)

अशा प्रकारे करण्यात आली सात कंत्राटदारांची नेमणूक!
१) वर्सोवा ते गोरेगाव बांगुर नगर

कंत्राटदार : ऍपको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड
कंत्राट रक्कम : जीएसटीसह २५४३.९० कोटी रुपये (विविध करांसह : ५५६०.४५ कोटी रुपये)
प्रकल्पाची लांबी : ४५४० मीटर
रस्त्यांची रुंदी : ४५ मीटर
मार्गिका : ४ अधिक ४ (Coastal Road)

२) बांगुर नगर ते मालाड माईंडस्पेस

कंत्राटदार : जे कुमार आणि एनसीसी संयुक्त कंपनी
कंत्राट रक्कम : जीएसटीसह ३०१६.३९ कोटी रुपये (विविध करांसह : ५५४६.७० कोटी रुपये)
प्रकल्पाची लांबी : १६६० मीटर
रस्त्यांची रुंदी : ४५ मीटर
मार्गिका : ३ अधिक ३ (Coastal Road)

३) चारकोप खाडी ते मालाड माईंडस्पेस (दक्षिण दिशा बोगदा)

कंत्राटदार : मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर
कंत्राट रक्कम : जीएसटीसह ३३६८.९१ कोटी रुपये (विविध करांसह : ६४९२.६० कोटी रुपये)
प्रकल्पाची लांबी : ३९०० मीटर
मार्गिका : ३ अधिक ३ (Coastal Road)

४) मालाड ते चारकोप (उत्तर दिशा बोगदा)

कंत्राटदार : मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर
कंत्राट रक्कम : जीएसटीसह ३३६९.६५ कोटी रुपये (विविध करांसह : ६४९३.९५ कोटी रुपये)
प्रकल्पाची लांबी : ३९०० मीटर
रस्त्याची रुंदी : १४.२९ मीटर
मार्गिका : ३ अधिक ३ (Coastal Road)

(हेही वाचा – Raj Thackeray यांना मिळाली बाबरीची वीट; आता राम मंदिराची वीट मिळवणार)

५) चारकोप खाडी ते गोराई

कंत्राटदार : लार्सन अँड टुब्रो
कंत्राट रक्कम : जीएसटीसह ३४६०.८५ कोटी रुपये (विविध करांसह : ६३४१.०४कोटी रुपये)
प्रकल्पाची लांबी : ३७८० मीटर
मार्गिका : ३ अधिक ३ (Coastal Road)

६) गोराई ते दहिसर 

कंत्राटदार : ऍपको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड
कंत्राट रक्कम : जीएसटीसह ३०२४.०९ कोटी रुपये (विविध करांसह : ५५६०.४५ कोटी रुपये)
प्रकल्पाची लांबी : ३६९० मीटर
रस्त्याची रुंदी : ३६ मीटर
मार्गिका : ३ अधिक ३ (Coastal Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.