Coastal Road : कोस्टल रोडच्या बोगद्याचा मार्ग ‘मावळा’ने पार केला

२६ एप्रिल २०२२ रोजी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) पासून  दुसऱ्या बोगद्याचे खनन सुरु झाले होते. त्याचा ब्रेक थ्रू ३० मे २०२३ रोजी प्रियदर्शनी पार्क येथे झाले.

208

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत बोगदा खनन १०० टक्के काम  पूर्ण  झाले असून भारतात प्रथमच या बोगदा खणनकरता सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे. हे खनन करण्यासाठी मावळा टीबीएमने खननेच काम  ३० मे २०२३ रोजी पूर्ण केले. विशेष म्हणजे आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, शिवाय उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये युटीलिटी बॉक्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. बोगदा खणणाऱ्या यंत्राने (TBM) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा  अर्थात १२.१९ मी.चा हा बोगदा आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतू वरळी टोकापर्यंतच्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्प(कोस्टल रोड) या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १२,७२१ कोटी  रुपये एवढा असून त्यामध्ये बांधकाम खर्च हा ८४२९ कोटी रुपये एवढा आहे.  या प्रकल्पाची भौतिक प्रगतीही ३० मे २०२३ पर्यंत ७५ टक्के तसेच आर्थिक प्रगती  ६८.७६ टक्के एवढी आहे.

अशाप्रकारे बोगदा खननचे काम झाले पूर्ण

प्रियदर्शनी पार्क ते स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी) या पहिल्या बोगद्याचे खनन ११ जानेवारी २०२१ रोजी सुरु झाले, तर १० जानेवारी २०२२ रोजी त्याचा ब्रेक थ्रू झाला होता. २६ एप्रिल २०२२ रोजी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) पासून  दुसऱ्या बोगद्याचे खनन सुरु झाले होते. त्याचा ब्रेक थ्रू ३० मे २०२३ रोजी प्रियदर्शनी पार्क येथे झाले. बोगद्याला ३७५ मि.मी. जाड काँक्रिट अस्तर. त्यावर अग्निप्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत फायरबोर्डची व्यवस्था  करण्यात आली आहे. यासाठी भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे.

(हेही वाचा BMC : भटक्या श्वानांच्या नसबंदीचे प्रमाण होतेय कमी; मागील वर्षांत सर्वांत कमी झाले निर्बिजीकरण)

या प्रकल्पामुळे नागरिकांना होणारे उपयुक्त फायदे –

  • सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७०टक्के वेळेची बचत, ३४ टक्के इंधन बचत होईल. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल.
  •  ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
  • अतिरिक्त जवळजवळ ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होऊन पर्यायाने मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल
  •  हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक (Cycle tracks), सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, (Jogging tracks), खुले प्रेक्षागृह (Open Theatre) इत्यादी समाविष्ट आहे.
  •  इतर मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सुरक्षित, जलद, कमी खर्चात प्रवास शक्य होईल
  •  मुंबईकरांना सागर किनारी अतिरिक्त विहारक्षेत्र (प्रॉमिनेड) उपलब्ध असेल.
  •  सागरी तटरक्षक भिंतीमुळे सागरी किना-याची धूप होण्यापासून संरक्षण तसेच वादळी लाटा व पूरापासून संरक्षण होईल.
  • हाजीअली व महालक्ष्मी मंदीर या धार्मिक स्थळांजवळ तसेच वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध  असेल.

प्रकल्पाच्या प्रगतीची आतापर्यंतची कामगिरी –

  • बोगदा खणन – १०० टक्केपूर्ण
  • पुनः प्रापण – ९५ टक्केपूर्ण
  • समुद्रभिंत – ८४ टक्के पूर्ण
  • आंतरबदल ५ ६टक्के पूर्ण
  • पूल – ५९ टक्के पूर्ण

अशाप्रकारे असेल हा प्रकल्प

  • रस्त्याची लांबी – १०.५८ कि.मी.
  • मार्गिका संख्या – ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)
  • भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी– ४.३५ कि.मी.
  • पुलांची एकूण लांबी– २.१९ कि.मी.
  • बोगदे– दुहेरी बोगद्यांची लांबी – प्रत्येकी २.०७ कि.मी., ११ मीटर अंतर्गत व्यास (प्रत्येकी ३ वाहनमार्गिका)
  • भूमिगत वाहनतळ – ०४, एकूण वाहनसंख्या – १८५६
  • एकूण भरावक्षेत्र– १११ हेक्टर
  • आंतरबदल- ०३, आंतरबदलाची लांबी-१५.६६ कि.मी.
  • नवीन पदपथ– ७.५ कि.मी.
  • बस वाहतुकीसाठी समर्पित मार्गिका
  • सागरी तटरक्षक भिंत– ७.४७ कि.मी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.