दिवाळीची भेट, कोब्रा थेट घरात!

दीड फुटाचा कोब्रा चक्क वॉशिंगमशीनमध्ये घरातील सदस्यांना आढळून आल्यानंतर त्यांना चांगलाच धक्का बसला.

दिवाळीत फराळाचा आनंद लुटताना तुम्ही व्यस्त असताना घरी विषारी पाहुणा आला तर?? गुरुवारी मुलुंडच्या उदय नगर परिसरातील घरात चक्क आपला आवडता फराळ ‘उंदीर’ खाण्यासाठी कोब्राने चक्क घरातील वॉशिंग मशीनमध्ये उडी मारली. घरातल्यांना वॉशिंगमधील कपडे काढताना कोब्राचे दर्शन झाले.

दीड फुटांचा साप 

दीड फुटाचा कोब्रा चक्क वॉशिंगमशीनमध्ये घरातील सदस्यांना आढळून आल्यानंतर त्यांना चांगलाच धक्का बसला. मशीन सुरु नव्हती, मात्र मशीनचा वरचा भाग उघडा होता, अशी माहिती घरातील सदस्यांनी रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) या प्राणीप्रेमी संस्थेला बचावासाठी घरात बोलावताना दिली. कोब्रा मशीनच्या आत असल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच मशीनवरच्या उघड्या भागाचे झाकण बंद केल्याने दुर्घटना टळली, अशी माहिती ‘रॉ’ या प्राणीप्रेमी संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी दिली. ‘रॉ’चे प्राणीप्रेमी स्वयंसेवक अॉम्सी पारा यांनी कोब्राची सुखरुप सुटका केली.

(हेही वाचा : हे तर मोदी सरकारला आलेले शहाणपण! सेनेचा हल्लाबोल)

नागरी वस्त्यांमध्ये जनावरांचा वावर 

सध्या मुंबईत नागरी वस्त्यांमध्ये जनावरांचा वावर वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच मुंबईत नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांची वावर वाढत आहे. त्यातच आता विषारी सापांचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here