महा कुंभ २०२५ मेळ्यांमध्ये Coca-Cola India सज्ज; दर ४०० मीटर्सच्या अंतरावर उत्पादने उपलब्ध

24
महा कुंभ २०२५ मेळ्यांमध्ये Coca-Cola India सज्ज; दर ४०० मीटर्सच्या अंतरावर उत्पादने उपलब्ध

जगातील काही सर्वात विशाल सांस्कृतिक मेळ्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या महा कुंभ २०२५ मध्ये कोका कोला, थम्स अप, चार्ज्ड, माझा, किनले, फॅण्टा आणि मिनिट मेड या आपल्या आयकॉनिक ब्रॅण्ड्सना लक्षावधी भाविकांच्या अधिक जवळ आणत या उत्सवात उत्साहाची लहर निर्माण करण्यासाठी कोका-कोला इंडिया सज्ज आहे. दर ४०० मीटर्सच्या अंतरावर कोका-कोला उत्पादने उपलब्ध करून देत, मेळाव्यासाठी आलेला कोणताही पाहुणा तहानलेला राहू नये याची खबरदारी ब्रॅण्डद्वारे घेतली जात आहे. (Coca-Cola India)

या प्रसंगाच्या औचित्याने कंपनीने भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांना मानवंदना म्हणून आपल्या निवडक पेयांसाठी महा कुंभ स्पेशल एडिशन पॅकिंग बाजारात आणले आहे. या खास डिझाइन्सनी कंपनीच्या उत्पादनांना एक स्थानिक सांस्कृतिक स्पर्श दिला आहे व त्यांतून एक जतन करून ठेवण्यासारखी संस्मरणीय ठेव निर्माण केली आहे. इतकेच नाही तर ग्राहकांची सोय व त्यांचा आनंद ध्यानात ठेवून या उत्पादनांची प्रत्यक्ष दुकानांतील मांडणी तयार करण्यात आली आहे. हायड्रेशन कार्टस् आणि फूड कोर्टसमध्ये ग्राहकांच्या सक्रिय सहभागास निमंत्रण देणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून पाहुण्यांना आपली तहान सहज भागवता यावी याची खबरदारी घेतली जाईल व त्याचवेळी कुंभमेळ्यात मिळणाऱ्या चविष्ट खाद्यपदार्थांना कोका-कोला पेयांची जोड दिली जाईल, ज्यामुळे प्रत्येक घास अधिकच चवदार बनेल. (Coca-Cola India)

(हेही वाचा – Walmik Karad च्या समर्थक परळीत आक्रमक; एसटी बसवर दगडफेक)

लक्ष वेधून घेणारी चित्रे आणि लोकांना सहभागी करून घेणारे उपक्रम यांच्या माध्यमातून कोका-कोला इंडिया उत्सवाचा अनुभव अधिकच संपन्न बनवित आहे व हे करताना आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून अर्थपूर्ण परिणाम घडवून आणत आहे.
कोका-कोला इंडिया व नैऋत्य आशियाच्या मार्केटिंग विभागाच्या व्हाइस प्रेसिडंट ग्रीष्मा सिंग म्हणाल्या, “देशाचे मानचिन्ह म्हणून गौरवल्या जाणाऱ्या काही भव्य सांस्कृतिक उत्सवांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मेळाव्याला हजेरी लावणाऱ्या लक्षावधी लोकांना ताजेतवाने करण्यामध्ये आपली भूमिका निभावत असल्याचा आम्हाला आनंद आहे. (Coca-Cola India)

आम्ही आमच्या वैविध्यपूर्ण उत्पादनश्रेणीतील पेयांची स्थानिक पदार्थ आणि चवींशी सांगड घालणार आहोत व महा कुंभाला भेट देण्यासाठी येणाऱ्या सर्व लोकांसाठी एका परिपूर्ण अनुभूतीची निर्मिती करणार आहोत. पुन्हा-पुन्हा वापरता येण्याजोग्या पॅकेजिंकच्या शक्यता दर्शविणाऱ्या आणि सामुदायिक कृतीला प्रेरणा देत रिसायकलिंगबद्दल जागरुकता निर्माण करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन या सोहळ्यात केले जाणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक प्रभाव निर्माण करण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत.” बदल घडवून आणण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कोका-कोला इंडियाने टाकाऊ PET बाटल्या गोळा करण्यासाठी व त्यांचे रिसायकलिंग करण्यासाठी वेस्ट मॅनेजमेंट उपक्रमही सुरू केला आहे. आनंदाच्या आणि लोकांशी जोडले जाण्याच्या चिरकाल टिकणाऱ्या स्मृती निर्माण करत कोका-कोला इंडिया महा कुंभ २०२५ ला एक नवी मिती जोडत आहे व या मेळ्याला भेट देणाऱ्या पाहुण्यांनी घरी परतताना केवळ आठवणीच नव्हे तर सामायिक उत्तरदायित्त्वाची एक अधिक सखोल जाणीव आपल्यासोबत न्यावी याचीही काळजी घेत आहे. (Coca-Cola India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.