केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (Directorate of Revenue Intelligence) (डीआरआय) (DRI) अधिकाऱ्यांनी चार विविध प्रकरणांत मुंबई विमानतळावर तसेच एका घरातून एकूण ७० कोटीं रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन भारतीय नागरिक आणि दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे, तर एका महिलेचादेखील समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नैराबी येथून प्रामुख्याने या कोकेनची तस्करी झाली आहे. यापैकी नैरोबी येथून आलेले कोकेन मुंबईत विरार येथे वास्तव्यात असलेल्या एका व्यक्तिच्या घरातून जप्त करण्यात आले आहे, तर इतर दोन प्रकरणांमध्ये प्रवासी बॅगेमध्ये बनावट कप्पे तयार करून त्यामध्ये कोकेन लपवण्यात आले होते.
(हेही वााचा – Israel-Hamas Conflict : इस्लामिक जिहाद गटाकडून चुकीच्या रॉकेट प्रक्षेपणामुळे विस्फोट !)
तिसऱ्या प्रकरणात एका व्यक्तिने कोकेनच्या कॅप्सूल्स गिळल्या होत्या. त्यालाही अटक करण्यात आली असून त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व वेगवेगळ्या प्रकरणांत एकूण ७ किलोचे कोकेन पोलिसांनी जप्त केले आहे.