Supreme Court : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्तींसाठी आचारसंहिता  

115

न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशाचे वर्तन आदर्श असावे, त्याच्यात नैतिक गुण असावेत, त्याने सत्याची कास धरावी, अशी सामान्य नागरिकाची अपेक्षा असतेच. न्याययंत्रणेवरील हीच विश्वासार्हता दृढ करण्यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पहिल्यांदाच औपचारिक नैतिक आचारसंहित जारी केली आहे. यात न्यायालयातील सर्वच सदस्यांनी कसे वागावे, याचे तात्विक विवेचन आणि नियम देण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आपल्या नऊ न्यायमूर्तींच्या नैतिक आचरणावर नियंत्रण ठेवणारी पहिली संहिता जारी केली आहे. त्यांनी औपचारिक आचारसंहिता स्वीकारली आहे. न्यायप्र‌विष्ठ खटल्याशी निगडीत व्यक्ती न्यायाधीशांसाठी लक्झरी ट्रिप आणि मोठमोठ्या भेटवस्तू देत असतात. अशा अघोषित लक्झरी ट्रिपमधील लाभार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा Raj Thackeray : मनोज जरांगेच्या मागे कोण बोलतोय लवकरच समोर येणार; काय म्हणाले राज ठाकरे?)

फेडरल न्यायपालिकेच्या इतर सदस्यांप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) नऊ आजीवन न्यायाधीशांनी आजपर्यंत कुठलीही आचारसंहिता न बाळगता दीर्घकाळ सेवा केली आहे. या न्यायाधीशांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले आहेत. आपल्याला कोणतेही नैतिक बंधन नाही, असे त्यांना वाटते. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच न्यायाधीशांसाठी नैतिक आचारसंहिता जारी केली आहे.

काही न्यायाधीशांनी अशिलांकडून खाजगी जेट विमान, लक्झरी सुट्ट्यांचे बुकिंग, रिअल इस्टेट, करमणूक, वाहन खरेदी अथवा गुपचूप सहलींचा आनंद लुटल्याचे समोर आले होते. याची चौकशी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयही चक्रावून गेले होते. याचे राजकीय क्षेत्रातही पडसाद उमटले होते. त्यामुळे काँग्रेसमधील (अमेरिकन संसदेतील) सदस्यांनी न्यायाधीशांना आचारसंहिता लागू करणे गरजेचे आहे, अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वरील पाऊल उचलले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.