पावसाच्या दिवसात वातावरणात धुलीकणाची मात्र कमी होत असताना लहान मुलांमध्ये सर्दी, खोकल्याचे प्रमाण फारच वाढत असल्याचे बालरोगतज्ञांच्या निदर्शनास आले आहे. तुमच्या मुलांना सतत दम लागत असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची एक मुसळधार सर येत आहे. त्या अगोदर जुलै महिन्यात पावसाने कहरच केला, तर ऑगस्ट महिन्यातील पंधरवड्यात पाऊस गायबच होता. जुलै महिन्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये फ्लूची साथ आली होती. मुंबईत मोठ्यांमध्ये अजूनही सतत तापाच्या तक्रारी दिसून येत आहेत, तर पाच वर्षांच्या मुलांमध्ये सर्दी आणि खोकला जास्त दिसून येत आहे, असे जनरल फिजिशयन सांगतात.
(हेही वाचा – Check whether you are addicted to mobile : स्मार्टफोनचं व्यसन मानसिक होतंय का?)
सध्याच्या स्थितीला 60 टक्के रुग्ण श्वसन विकाराशी संबंधित आहेत. त्यापैकी दहा ते वीस टक्के रुग्ण गंभीर आजारी असून पाच ते दहा टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. वातावरणीय बदलांमुळे मुलांमध्ये हा त्रास दिसत असल्याचे डॉक्टर सांगतात. मुलांवर योग्य उपचार केला, तर आरोग्य पूर्ववत होण्यास मदत होते, मात्र डॉक्टरांकडे उशिरा आला तर गुंतागुंत वाढू शकते. मुलांमध्ये श्वसन विकाराचे गंभीर लक्षण आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांकडे उपचार सुरू करा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
बालरोग तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच मुलांना श्वसन विकाराच्या समस्या जाणवत आहेत. वायरल निमोनिया आणि ब्रॉकिओलायटीस हे दोन आजार दिसून येतात. वायरल निमोनियामध्ये लहान मुलांच्या फुफ्फुसांना सूज दिसून येत आहे. ब्रॉकिओलायटीसमध्ये फुफ्फुसांना संसर्ग होतो. अनेकदा मुलांना ताप येत नाही पण चालताना धाप लागते. वातावरणात थंडावा वाटलं की त्याचा थेट परिणाम मुलांच्या श्वसन व्यवस्थेवर दिसून येतो. बरेचदा श्वसन विकाराचा व्याधी वाढत असताना नाक चोंदणे, सर्दी होणे, सतत शिंका येणे, उलट्या होणे असे प्रकार घडतात. सात दिवस आजार होतो, त्यानंतर बरा होतो, अशी माहिती बालरोग तज्ञ देतात. श्वसनात अडथळे येत असेल, तर तातडीने रुग्णालयात मुलांना दाखल करा, असेही डॉक्टरांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community