गेल्या चार ते पाच दिवसात संपूर्ण देशात थंडीचा चांगलाच तडाखा बसला आहे. पुढील काही दिवस अशीच थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे कोकणात गारठा वाढला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. तर पुढील चार दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. (Weather Update)
अजून दोन दिवस थंडी राहण्याची शक्यता
येत्या पाच दिवसात पुन्हा ढग दाटून येण्याची शक्यता आहे कारण बांगलादेशावर चक्रीवादळाचे क्षेत्र ३.१ किमीपर्यंत पसरलं आहे. परिणामी डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम मैदानी भगत कडाक्याच्या थंडीच्या रूपाने दिसत आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडील भागात कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार,१८ जानेवारीला गेल्या दोन वर्षांतील या वेळेपेक्षा जास्त थंडीची नोंद झाली.२२ जानेवारीपर्यंत अशीच थंडी राहण्याची शक्यता आहे. (Weather Update)
(हेही वाचा : Nagpur Crime : घरफोडी करणाऱ्या बांगलादेशीय टोळीचा पर्दाफाश; दोघेजण पोलिसांच्या ताब्यात)
थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता
दरम्यान पंजाब आणि हरियाणा मध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. पंजाब हरियाणा मध्ये २० आणि २१ जानेवारी रोजी उत्तर राजस्थानवर २० ते २१ जानेवारी २०२४ दरम्यान थंडीची लाट येणाची शक्यता आहे. असा अंदाज आययएमडीने वर्तवला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community