देशाच्या उत्तर भागांत थंडीमुळे तापमान शून्य अंशाच्याही खाली सरकत असल्याने उत्तरेत बर्फवृष्टीची शक्यता केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केली. पंजाब, हरयाणा, राजस्थान तसेच गुजरात आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीच्या लाटेला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी राज्यातील उत्तर-मध्य महाराष्ट्रात २७ जानेवारीपर्यंत थंडीच्या लाटेची परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.
सर्वात कमी तापमानाची नोंद महाबळेश्वरात
२८ जानेवारीपर्यंत पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिका-यांनी व्यक्त केला. सोमवारी उत्तर मध्य महाराष्ट्रातील भागांतच थंडीचा कडाका वाढल्याचे किमान तापमानाच्या नोंदीतून स्पष्ट झाले. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे झाली. महाबळेश्वर येथे किमान तापमानाची नोंद ६.५ अंश सेल्सिअसवर झाली. त्याखालोखाल नाशिक येथे किमान तापमान ६.६ अंश सेल्सिअसर खाली उतरले. जळगाव येथे किमान तापमान ९.२ अंश सेल्सिअसवर तर मालेगावमध्येही किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. पुण्यातही किमान तापमानाची नोंद १०.४ अंश सेल्सिअसवर झाली.
(हेही वाचा मुंबईच्या हवेची गुणवत्ता ‘धोकादायक’! मंगळवारपर्यंत आरोग्यासाठी ‘रेड अलर्ट’)
Join Our WhatsApp Community