राज्यात थंडीचे प्रमाण आता कमी झाले आहे. संपूर्ण राज्यात आता किमान पाच दिवस गारठवणारी थंडी नसेल. बुधवारपासून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात कमाल तापमान वाढ दिसून आली. राज्यात कमाल आणि किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होणार असल्याची माहिती वेधशाळेच्या अधिका-यांनी दिली आहे.
( हेही वाचा : पुण्यात रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा, लाल महाल येथून होणार सुरुवात)
गेल्या आठवड्यात उत्तरेत गारठवणा-या थंडीसाठी अनुकूल असलेल्या पश्चिमी प्रकोपच्या (वेस्टर्न डिस्टर्बन्स) प्रभावामुळे थंड वाऱ्यांचा राज्यावरील प्रभाव कमी झाला आहे. सध्या हिमाचल प्रदेश आणि परिसरात प्रदेशात हिमवृष्टी सुरु आहे. परंतु थंडी वाहून आणणारे वारे प्रभावी नसल्याने बुधवारी किमान आणि कमाल तापमान दोन ते तीन अंशाने वाढ दिसून आली. तापमानात आता फारसा बदल होणार नाही. आठवडाभर किमान आणि कमाल तापमान सरासरीच्याजवळपास दिसून येईल. त्यामुळे गारठवणा-या थंडीसाठी पुढच्या आठवड्याची प्रतीक्षा करावी लागेल. मुंबईत बुधवारी किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. पुढील काही दिवस किमान तापमान १६ तर कमाल तापमान ३१ अंशापर्यंत नोंदवले जाईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक सुनील कांबळे यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community