Cold Wave In Mumbai : पुढील २ दिवस हुडहुडी भरणार; मुंबईचे किमान तापमान १४ अंशांवर येण्याची शक्यता

68
पुढील २ दिवस हुडहुडी भरणार; मुंबईचे किमान तापमान १४ अंशांवर येण्याची शक्यता
पुढील २ दिवस हुडहुडी भरणार; मुंबईचे किमान तापमान १४ अंशांवर येण्याची शक्यता

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातील किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या आसपास नोंदविला जात आहे. सोमवार, ६ जानेवारी रोजीदेखील मुंबईचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गुरुवारनंतर मात्र पुन्हा एकदा मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविली जाईल. (weather forecast mumbai) किमान तापमान सर्वसाधारण नोंदवले जाईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. (Cold Wave In Mumbai)

(हेही वाचा – Investment Scam : टोरेस कंपनीच्या संचालकासह ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल, सव्वा लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा दावा)

हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या परिसरामध्ये सातत्याने होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या गार वाऱ्याचा प्रभाव अधिक वाढला आहे. त्यामुळे थंड वारे राज्य आणि मुंबईकडे वाहत असल्याने मंगळवारी, बुधवारी मुंबईचे किमान तापमान १४ अंश नोंदवण्यात येईल, तर राज्यभरातील अनेक शहरांचे किमान तापमान एक अंकी नोंदवण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

कोकणातील अनेक शहरांचा किमान तापमानाचा पारा १४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, तर राज्यभरामध्ये मराठवाडा (Marathwada), विदर्भ (Vidarbha) आणि उत्तर महाराष्ट्रमध्ये एक अंकी तापमान नोंदवले जाईल. उत्तर महाराष्ट्रमध्ये काही शहरांचे किमान तापमान सहा अंश नोंदविले जाण्याची शक्यता आहे. (Cold Wave In Mumbai)

शहरांचे आजचे तापमान किती आहे ?

मुंबई                           १६
नाशिक                        १४
धाराशिव                       ११
परभणी                        ११
सातारा                         १२
अहिल्यानगर                     १२
छ. संभाजीनगर                  १५
जळगाव                          ११
महाबळेश्वर                       १४
मालेगाव                          १४

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.