Weather Update : राज्यभरात थंडी कमी झाली; काय आहेत कारणे ?

83
Weather Update : राज्यभरात थंडी कमी झाली; काय आहेत कारणे ?
Weather Update : राज्यभरात थंडी कमी झाली; काय आहेत कारणे ?

गेल्या आठवडाभरात मध्य महाराष्ट्रात पारा नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. रविवार, १ डिसेंबरपासून मात्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली असून, किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे (fengal cyclone) राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. (Weather Update)

(हेही वाचा – Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला ? नावाची घोषणा कधी होणार ? वाचा सविस्तर…)

राज्यात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पाच डिसेंबरपर्यंत राज्याच्या बहुतेक भागात हलक्या ते अत्यंत हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता अधिक आहे, अशी माहिती हवामान विभागाचे (Department of Meteorology) निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

गेला आठवडाभर मध्य महाराष्ट्रात किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. नाशिक, नगर, पुण्यात गारठा वाढला होता. पण, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडी कमी झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. ८ डिसेंबरपासून थंडीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात तयार झालेले ढगाळ वातावरण निवळून पुन्हा थंडी पडण्याचा अंदाज आहे. (Weather Update)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.