Weather update : नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी! कसं असेल राज्यातील हवामान?

सध्या राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी तापमानात वाढ दिसून येत आहे. मुंबईसह उपनगर ठाणे आणि कोकणातही तापमानाचा पारा घसरला आहे.

235
Weather update : नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी! कसं असेल राज्यातील हवामान?
Weather update : नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी! कसं असेल राज्यातील हवामान?

राज्यात थंडी आणि धुक्यासाह (Fogg) पावसाची (Rain update) रिमझिमही पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी तापमानात वाढ दिसून येत आहे. मुंबईसह (mumbai) उपनगर ठाणे आणि कोकणातही तापमानाचा पारा घसरला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील तापमानात आणखी बदल होऊन पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Weather update)

राज्यातील तापमानात घट
येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. डिसेंबर अखेर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाअखेर आणि नववर्ष स्वागताला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. (Weather update)

(हेही वाचा : Coronavirus : भारतात २४ तासांत ५२९ कोरोना रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू)

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात हुडहूडी
काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा परिणाम राज्याच्या वातावरणावरही होत असल्याचं दिसत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.