Cold Weather Update : राज्याला हुडहुडी भरणार; पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात घट

राज्यातील पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होणार असून कोरडे वातावरण निर्माण होईल. याचा परिणाम म्हणून राज्याचे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे.

347
Cold Weather Update : राज्याला हुडहुडी भरणार; पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात घट

खास थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक शिमला, कुलू, मनाली ते जम्मू कश्मीर पर्यंतचा प्रवास करतात. मात्र गेले आठ दिवस या थंडीची मजा दिल्लीकर घरातच अनुभवत आहेत. प्रचंड कडाक्याची थंडी (Cold Weather Update) आणि धुक्याचे साम्राज्य असल्यामुळे हिल स्टेशनला असल्याचा अनुभव दिल्लीकरांना येतोय. अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत धुकेच धुके दिसत आहेत. शिवाय कडाक्याची थंडी असल्यामुळे नियमित कामकाज करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे शाळांना थंडीच्या सुट्ट्या दिल्ली सरकारने जाहीर केल्या आहेत.

(हेही वाचा – Boycott Maldives: ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम समितीकडून ‘बॉयकॉट मालदीव’ मोहिमेला पाठिंबा, पर्यटन व्यापार संघटनांना आवाहन)

थंडीचा कडाका वाढणार –

दर दुसरीकडे राज्यातही तापमानात (Cold Weather Update) काहीशी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात हलका पाऊस पडत होता, मात्र आता पावसाचे प्रमाण एकदम कमी होऊन थंडीचा कडाका वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेली हवेची द्रोणीय रेषा, आग्नेय दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात पावसाने हजेरी लावली होती. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. बुधवारी (१० जानेवारी) पावसाचा जोर कमी होत असल्याचे दिसून आले. (Cold Weather Update)

(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तीन तास राहणार बंद, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कसे असेल नियोजन; वाचा सविस्तर)

तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी –

आजपासून म्हणजेच गुरुवार ११ जानेवारीपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होणार असून कोरडे वातावरण निर्माण होईल. याचा परिणाम म्हणून राज्याचे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. (Cold Weather Update)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.