Hindu Rashtra च्या स्थापनेसाठी देशभरात २० हजारांहून अधिक भाविकांकडून ‘सामूहिक हनुमान चालीसा पठण’ !

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक हिंदूंनी घेतला या उपक्रमाचा लाभ !

99
Hindu Rashtra च्या स्थापनेसाठी देशभरात २० हजारांहून अधिक भाविकांकडून 'सामूहिक हनुमान चालीसा पठण’ !

हिंदु राष्ट्राच्या (Hindu Rashtra) स्थापनेसाठी सनातन संस्थेच्या वतीने आज देशभरात सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने ठिकठिकाणी असलेल्या श्री हनुमान मंदिरे, श्रीराम मंदिरे यांसह अन्य शेकडो ठिकाणी २० हजारांहून भाविक, साधक, हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले. यात समविचारी संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योजक, विचारवंत आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीही सहभागी झाली होती. तसेच विविध जिज्ञासू या पठणाच्या कार्यक्रमात उत्साहपूर्ण सहभागी झाले होते. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून १ हजाराहून अधिक हिंदूंनी घेतला या उपक्रमाचा लाभ घेतला. (Hindu Rashtra)

(हेही वाचा – Are Banks Working on 31st March ? ३१ मार्चला बँका सुरू असतील का?)

२९ मार्च या दिवशी शनिगोचर अर्थात श्री शनिदेवानी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. या शनिगोचरचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होण्यासाठी देशभरात सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. श्री हनुमान चालिसा पठणाच्या वेळी श्री हनुमंत आणि श्री शनिदेव यांच्या चरणी हिंदु राष्ट्राची (Hindu Rashtra) लवकरात लवकर स्थापना होण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या अनेकांनी आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेतला, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना अशा उपक्रमांतून ऊर्जा मिळाल्याचे मनोगत भाविकांनी व्यक्त केले. (Hindu Rashtra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.