अमेरिकन एअरलाइन्सचं (American Airlines) विमान हवेतच लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकून भीषण अपघात झाला. या धडकेनंतर विमान आणि हेलिकॉप्टर नदीत कोसळले. या विमानात ६४ प्रवासी होते, अशी माहिती समोर येत आहे. हा अपघात वॉशिंग्टन डिसीमध्ये रीगन नॅशन एअरपोर्टजवळ बुधवारी रात्री घडला. या घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. (Washington DC Plane Crash)
(हेही वाचा – Steve Smith : स्टिव्ह स्मिथच्या कसोटीत १०,००० धावा पूर्ण, यापूर्वी कुणी केल्या आहेत इतक्या धावा?)
मिळालेल्या माहितीनुसार, लहान पॅसेंजर विमान ५४ प्रवाशांना घेऊन निघाले होते. कॅन्सासहून वॉशिंग्टनच्या दिशेने हे विमान आले होते. एअरलाइन कंपनीने माहिती देताना म्हटले की, पीएसएकडून चालवले जाणारे अमेरिकन ईगल फ्लाइट ५३४२ विमान कॅन्सासहून वॉशिंग्टन रीगन नॅशन एअरपोर्टला येत होते. त्या वेळी विमानाची हेलिकॉप्टरला धडक बसली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रीगन नॅशनल एअरपोर्ट (DCA) वर स्थानिक वेळेनुसार रात्री 8:50 नंतर विमान अपघाताबाबत अनेक कॉल आले. अपघातात सामील असलेले हेलिकॉप्टर यूएस आर्मी ब्लॅकहॉक (एच-60) होते. विमान कंपनीने रात्री 9 नंतर अपघाताची पुष्टी केली. या भीषण धडकेनंतर विमान आणि हेलिकॉप्टर नदीत कोसळले. नदीतून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातामुळे सध्या विमानतळावर सर्व उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आले आहे. दोन्हींचे अवशेष सध्या पोटोमॅक नदीत आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बचावकार्य सुरू आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या गंभीर दुर्घटनेबाबत माहिती मिळाली असल्याचे सांगितले. तसंच तातडीने बचावकार्यासाठी धावून जाणाऱ्यांचे त्यांनी कौतुकही केले आहे. तसेच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी एक्सवर पोस्ट करून या घटनेवर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली. दुर्घटनेतील लोकांसाठी प्रार्थना करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. (Washington DC Plane Crash)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community