प्रयागराज (Prayag) येथे महाकुंभमेळ्याला (Maha Kumbh Mela 2025) आज आरंभ झाला आहे. या कुंभपर्वाचा लाभ घेण्यासाठी नाशिक येथील महंत अनिकेतशास्त्री (Mahant Aniketasashtri) हेही प्रयागक्षेत्री पोहोचले आहेत. त्यांनी प्रयागराज येथून एका व्हिडिओद्वारे प्रयागराज क्षेत्रातील कुंभपर्वाचे महात्म्य सांगितले आहे.
महंत अनिकेतशास्त्री यांनी म्हटले आहे की, सूर्यसंहितेनुसार, सूर्य मकर राशीत आणि बृहस्पती वृषभ राशीत असतांना आणि माघ मासातील अमावास्येला प्रयागक्षेत्री महाकुंभमेळा भरतो. महाभारताच्या वनपर्वात कुंभपर्वात म्हटले आहे की, जे कुंभपर्वाच्या काळात स्नान करतात, त्यांना देवलोकाची प्राप्ती होते. हजारो अश्वमेध, शेकडो वाजपेय यज्ञ आणि लाखो वेळा पृथ्वीदान करण्यापेक्षाही कुंभपर्वात स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : जसप्रीत बुमराह अख्ख्या चॅम्पियन्स करंडकाला मुकण्याची शक्यता )
प्रयागमहात्म्य ग्रंथात म्हटले आहे की, प्रयागक्षेत्राला त्रिवेणी संगम असेही म्हणतात. सरस्वती ज्ञानस्वरूपा, गंगा नदी भक्तीस्वरूपा आणि यमुना नदी कर्मस्वरूपिणी आहे. ती संसाररूपी रोगावरील महाऔषधी आहे. कुंभपर्वात जो स्नान, दान आदी करतात, त्याला अमृतत्व प्राप्त होतो.
कुंभचा पारमार्थिक अर्थ आहे, कुं म्हणजे कुत्सित, उंभती म्हणजे दुर्यती. याचा अर्थ कुत्सित, दुर्विचारांना दूर करतो, तो कुंभ, असे म्हटले गेले आहे. त्यामुळे तीर्थराज प्रयागला येऊन मनुष्यजीवनाचे सार्थक करा आणि धर्माचे रक्षण करा, असे आवाहन नाशिक (Nashik) येथील महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी केले आहे. (Maha Kumbh Mela 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community