…आणि डॉक्टर खळखळून हसले!

ताणतणाव व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकंदरीत आयुष्यातील विनोदाचे व हास्याचे महत्त्व याविषयी सुप्रसिद्ध विनोदवीर एहसान कुरेशी व अली असगर यांनी हलक्याफुलक्या व प्रभावी शब्दांत आपली मते अनेक उदाहरणे व विनोदी किस्से सांगत मांडली.

कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून रात्रीचा दिवस करत महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील डॉक्टर रुग्णसेवा करत आहे. रुग्णांची ही सेवा करताना त्यांना आपल्या घराकडेही लक्षही द्यायला वेळ नाही की, मुलाबाळांशी चार शब्दही बोलता येत नाही. सतत डोक्यावर कामाचा ताण. त्यामुळे ताणतणावाखाली असलेल्या महापालिकांच्या रुग्णालयातील डॉक्टर हा खळखळून हसला. विनोदवीर एहसान कुरेशी आणि अली असगर या दोन्ही विनोदवीरांनी गंभीर चेहऱ्याच्या या डॉक्टरांमध्ये हास्य कल्लोळ माजवला. डॉक्टरांना पोट दुखेपर्यंत हसवताना विनोदवीरांना मागील वर्षभराचा त्यांचा थकवाच दूर करण्याचा प्रयत्न केला. निमित्त हेाते डॉक्टरांच्या क्षमता वाढीच्या कार्यशाळेचे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ महापालिकेच्या विविध रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी रुग्णांना सातत्याने अतिशय चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा देत आहेत. यामुळे जनसामान्यांमध्ये महापालिकेच्या रुग्णालयांवर असणारा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अविरतपणे रुग्णसेवा करत असणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमतेने वैद्यकीय सेवा देता याव्यात, यासाठी त्यांचे मनोबल उंचावणे आणि शारीरिक क्षमता वृद्धी होणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष क्षमतावृद्धी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
– सुरेश काकाणी,  अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे)

‘कोविड – १९’ या साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर अविरतपणे कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांची भावनिक, मानसिक व शारीरिक क्षमता वृद्धी व्हावी; यादृष्टीने रुग्णालयांच्या स्तरावर कार्यशाळा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. यानुसार अशा प्रकारच्या पहिल्या कार्यशाळेचे आयोजन शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी करण्यात आले. शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी आयोजित पहिल्या क्षमतावृद्धी कार्यशाळेच्या उद्घाटन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याहस्ते पार पडले. या कार्यक्रमाला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉक्टर रमेश भारमल, के.ई.एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख, उपनगरीय रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रदीप जाधव आणि शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी; यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टर, परिचारिका व रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

(हेही वाचा : ऑक्सिजन कॉन्संट्रेटरसाठी कॉर्पोरेट कंपन्या आणि संस्थांकडून महापालिकेला मदत!)

अनेक महिन्यांचा असलेला त्यांचा क्षीणही त्यांचा दूर झाला

ताणतणाव व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकंदरीत आयुष्यातील विनोदाचे व हास्याचे महत्त्व याविषयी सुप्रसिद्ध विनोदवीर एहसान कुरेशी व अली असगर यांनी हलक्याफुलक्या व प्रभावी शब्दांत आपली मते अनेक उदाहरणे व विनोदी किस्से सांगत मांडली. यावेळी त्यांनी केलेल्या विनोदामुळे सभागृहातील प्रत्येक डॉक्टर खळखळून हसले. अनेक महिन्यांचा असलेला त्यांचा क्षीणही त्यांचा दूर झाला. कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात शीव रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञ प्रा. डॉक्टर सुषमा सोनावणे यांनी वैद्यकीय व्यवसायात संपर्क कला कशी साधावी? व मानसिक ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे? याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर भौतिकोपचार तज्ञ व सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विशाखा पाटील यांनी आरोग्याचे सुलभीकरण व शारीरिक सक्षमीकरण याविषयी अतिशय साध्या सोप्या शब्दात उपस्थितांशी संवाद साधला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here