Mumbai Public Toilets : शहरातील चार सामुदायिक प्रसाधनगृहांच्या बांधकामाला सुरूवात; दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत या प्रसाधनगृहांची दैनंदिन स्वच्छता, निर्जंतुकीकरण केले जाते.

107
Mumbai Public Toilets
Mumbai Public Toilets

मुंबई शहर भागातील हाती घेण्यात येणाऱ्या ८६ ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयापैकी परळ विभागातील राम टेकडी मार्ग व हिमालया चाळ (परळ), डब्बेवाला चाळ (शिवडी), तसेच बरकत अली नगर (वडाळा) येथील सामुदायिक प्रसाधनगृह पुनर्बांधणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. या सर्व शौचालयाचे भूमिपूजन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गुरुवारी ९ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडले. (Mumbai Public Toilets)

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत या प्रसाधनगृहांची दैनंदिन स्वच्छता, निर्जंतुकीकरण केले जाते. परळ, शिवडी आणि वडाळा येथील सामुदायिक प्रसाधनगृह बांधणीचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या कामांचे भूमिपूजन मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. आमदार कालिदास कोळंबकर, आमदार आर. तमील सेल्वन, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, उपआयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. (Mumbai Public Toilets)

(हेही वाचा – Raj Thackeray : हायकोर्टाकडून दिलासा, काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या..)

मुंबई मध्ये अनेक झोपडपट्टी बहुल विभागांमध्ये टप्पा १२ मधुन वस्ती स्वच्छता कार्यक्रमा अंतर्गत सामुदायिक प्रसाधनगृहांचे पुर्नबांधणी करण्यात येत आहे. मुंबई शहर विभागात एकुण ८६ ठिकाणी असे प्रसाधनगृहांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. राम टेकडी मार्ग येथील सामुदायिक प्रसाधनगृहांमध्ये एकूण १९ शौचकुपे, डब्बेवाला चाळीसाठी एकूण २२ शौचकुपे, हिमालया चाळसाठी एकूण ३७ शौचकुपे आणि बरकत अली नगर येथे एकूण ५१ शौचकुपे बांधण्यात येणार आहेत. (Mumbai Public Toilets)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.