व्यावसायिक गॅस सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त

158

तेल कंपन्यांनी मंगळवारी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 91.50 पैशांची कपात केली आहे. या कपातीमुळे आता दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडर 1907 रुपयांचा झाला आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी 19 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 102.50 रुपयांनी कपात केली होती, मात्र सिलिंडरच्या किंमत 2 हजार रुपयांपेक्षा जास्त होती. दिल्लीत विना सबसिडीवाल्या 14.2 किलोच्या इंडेन गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. कोलकातामध्ये गॅस सिलिंडरच्या किंमत 926 रुपये आहे. मुंबईत, घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत सध्या 915.50 रुपये आहे.

(हेही वाचा Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग? वाचा…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.