नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी सर्व समान्यांना दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक (कमर्शिअल) सिलेंडर (Commercial gas) दरात (Gas Cylinder Price) कपात केली आहे. त्यामुळे व्यावसायिक वापराचे सिलेंडर 14 ते 16 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. दरम्यान, घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. (Gas Cylinder Price)
हेही वाचा-नववर्षानिमित्त Raj Thackeray यांचा मनसैनिकांसाठी खास संदेश; म्हणाले, “निवडणुकीत जे घडलं ते…”
व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन किंमती (Gas Cylinder Price) आज, बुधवारी (१ जाने.) जाहीर झाल्या आहेत. आयओसीएलच्या वेबसाईटवर अपडेट केलेल्या किंमतीनुसार, राजधानी दिल्लीत 1 जानेवारीपासून एचपीजी सिलिंडरची किंमत आता 1804 रुपये झाली आहे. पूर्वी दिल्लीत कमर्शिअल सिलेंडरचे दर 1818.50 रुपये होते. त्यात आता 14.50 रुपयांची घट झाली आहे. तर कोलकाता येथे सिलेंडर 16 रुपयांनी आणि मुंबईत 15 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चेन्नईमध्ये पूर्वी कमर्शिअल सिंलेंडर 1980.50 रुपयांचे होते. त्यात घट होऊन हे दर 1966 रुपये झाले आहेत. (Gas Cylinder Price)
हेही वाचा- Ministry Entrance Pass : आता घरबसल्या मंत्रालयातील प्रवेशाचा पास ॲपवरून काढता येणार
बऱ्याच काळापासून, 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या (एलपीजी किमतीत बदल) किंमतींमध्ये बदल होत आहे, परंतु 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी डिसेंबर महिन्यात कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती आता दर कपात करून गॅस कंपन्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काहीसा दिलासा दिला आहे. (Gas Cylinder Price)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community