लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या शेवटच्या अर्थात ७व्या टप्प्यात ग्राहकांना सिलिंडरबाबत दिलासा देणारी बातमी आहे. तेल विपणन कंपनीने (ओएमसी) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे. सर्वसामान्य जनतेला हा मोठा दिलासा आहे. नवीन दर १ जूनपासून लागू करण्यात आले आहेत. ( Commercial LPG Cylinders)
मिळालेल्या माहितीनुसार, कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 69.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी, (१ जून) देशभरातील 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली. (Commercial LPG Cylinders)
(हेही वाचा – Hording : रेल्वेच्या हद्दीतील २९ मोठे जाहिरात फलक आजही ‘जैसे थे’ च)
केवळ जुन्या दरांवर उपलब्ध
दिल्लीमध्ये कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत 69.50 रुपये, कोलकातामध्ये 72 रुपये, मुंबईत 69.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. ही कपात केवळ व्यावसायिक सिलेंडरसाठी लागू असेल. सध्या घरगुती सिलिंडरवर कोणताही दिलासा नाही आणि ते केवळ जुन्या दरांवर उपलब्ध असतील.
दिल्लीतील 19 किलो सिलिंडरची किंमत रु. 1676.00, कोलकाता रु. 1787.00, मुंबई रु. 1629.00, चेन्नई रु. 1840.50. एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 30 रुपयांहून अधिक कपात करण्यात आली होती. या कपातीनंतर दिल्लीत याची किंमत वाढून 1764.50 रुपये झाली आहे. मुंबईत 1717.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1930 रुपये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत होती. मे महिन्यात दिल्लीत सिलेंडरची किंमत 1745.50 रुपये, कोलकात्यात 1859 रुपये आणि मुंबईत 1698.50 रुपये होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community