मुंबईकरांना मोठा दिलासा, व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत घट

120

सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे. यासह, 19 किलो एलपीजी व्यावसायिक सिलिंडरच्या  किंमतीत 36 रुपयांची कपात करण्यात आली आहे. नवीन दर आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीही कमी करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील LPG सिलेंडरची किंमत 

मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 32.5 रुपयांनी कमी झाली आहे. आता गॅस सिलेंडर 1811.50 किमतीला मिळणार आहे. यापूर्वी मुंबईत 19 किलोचा एलपीजी व्यावसायिक सिलिंडर 1,844 रुपयांना मिळत होता.

( हेही वाचा: पाकिस्तान सरकारच्या ट्वीटर अकाऊंटवर भारतात बंदी; ‘हे’ आहे कारण )

1 सप्टेंबरला झाली होती कपात 

याआधी 1 सप्टेंबर रोजी देखील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये कपात केल्यानंतर मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1844 रुपये होती. त्याचवेळी, 6 जुलै रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात प्रति युनिट 8.5 रुपयांनी कपात करण्यात आली.

1 तारखेला गॅसची किंमत होते निश्चित

गॅस कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. व्यावसायिक गॅस सिलिंडर बहुतेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने किंवा लग्नसमारंभात वापरले जातात. विशेष म्हणजे, सलग पाचव्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.