ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात एका सकारात्मक बातमीने झाली आहे. या बातमीमुळे व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल १०० रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात सिलेंडरच्या दरात किरकोळ वाढ नोंदवली गेली होती. विशेष म्हणजे फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात झाली असून, घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र स्थिर आहेत.
एलपीजी (LPG) गॅस किंमतीत बदल
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या नव्या किंमती ठरवल्या जातात. याच पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६८० रुपयांवर पोहोचली आहे, जी ४ जुलै रोजी दरवाढीमुळे १७८० रुपयांवर पोहोचली होती.
(हेही वाचा – Riot : हरियाणात दंगल; वाहनांची तोडफोड, इंटरनेट बंद, कलम १४४ लागू)
इतर राज्यांतील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती
कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये १९ किलोच्या स्वयंपाकाच्या व्यासायिक गॅस सिलेंडरची किरकोळ किंमत आजपासून (१ ऑगस्ट) अनुक्रमे १८०२.५० रुपये, १६४०.५० रुपये आणि १८५२.५० रुपये इतकी आहे. दरम्यान, १४.२ किलो एलपीजी सिलेंडर किंवा घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत सुधारणा करण्यात आलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community