महागाईची झळ! एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ

142

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच महाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 250 रुपयांची वाढ केली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे सध्या घरगुती सिलिंडरच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत किती किंमत?

शुक्रवारी झालेल्या दरवाढीनंतर 19 किलो एलपीजी सिलिंडरसाठी दिल्लीत शुक्रवारपासून 2 हजार 253 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, मुंबईत 2 हजार 205 रुपयांना 19 किलो एलपीजी सिलिंडर मिळणार आहे.

 

22 मार्चपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. तसेच, विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता शुक्रवारपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली.

( हेही वाचा: आता सर्वसामान्यांचे ‘घर’ घेण्याचे स्वप्न महागणार! )

कोणत्या शहरात किती दर?

19 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1 मार्च रोजी 2 हजार 12 रुपये होती. तर 22 मार्च रोजी त्यात घट होऊन दर 2 हजार 3 रुपयांवर आला. पण शुक्रवारी 1 एप्रिल रोजी या सिलिंडरची किंमत 2 हजार 253 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत या सिलिंडरसाठी आता 1 हजार 955 रुपये ऐवजी 2 हजार 205 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 2 हजार 351 रुपये, चेन्नईत 2 हजार 406 रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी 1 मार्च रोजी 19 किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत 9 रुपयांनी कमी झाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.