Commissioner : आयुक्तांना, नकोय अधिकाऱ्यांकडून  कोंबडा!

मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी चार दिवसांपूर्वी एक परिपत्रक जारी केले

242
Commissioner : आयुक्तांना, नकोय अधिकाऱ्यांकडून  कोंबडा!
Commissioner : आयुक्तांना, नकोय अधिकाऱ्यांकडून  कोंबडा!

विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महापालिकेच्या कामकाजा आता खुद्द महापालिका आयुक्त तथा प्रशासक हे शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी आता प्रत्येक अतिरिक्त आयुक्त, सहआयुकत,उपायुक्त तसेच खातेप्रमुखांना प्रत्येक फाईल्सवर कोणत्याही अभिप्रायशिवाय स्वाक्षरी करू नका अशाप्रकारचे निर्देश दिले आहे. त्यामुळे आजवर फाईल्सवर कोंबडा काढून अर्थात कोणत्याही अभिप्रायशिवाय स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता प्रत्येक फाईल्स तसेच पेपरवर सकारात्मक किंवा नकारात्मक अशाप्रकारे मत मांडून सुचना केल्या जाव्यात अशाप्रकारचे निर्देश दिले आहेत.

मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी चार दिवसांपूर्वी एक परिपत्रक जारी केले आहे. ज्या परिपत्रकांमध्ये यापूर्वी म्हणजे ऑगस्ट २०२० व सन २०२२मध्ये जारी केलेल्या दोन परिपत्रकांतील सुचनोचे पालन होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आयुक्तांनी पुन्हा एकदा  या परिपत्रकाचे स्मरण करून देत यापूर्वी केलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामध्ये प्राधान्याने अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त,उपायुक्त आणि खातेप्रमुखांना प्राधान्याने सूचना करत प्रत्येक फाईल्स तसेच पेपरवर स्वाक्षरी करताना त्याबाबतच्या आपल्या सूचनांचेही टिपणही नोंद केले जावे असे म्हटले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपले मत न  मांडता किंवा सूचना न मांडता यापूर्वी केवळ कोंबडा काढून  आयुक्तांच्या मंजुरीला  पाठवला जात होता.

(हेही वाचा-Crime Branch : मुंबई गुन्हे शाखेला पूर्णवेळ पोलीस उपायुक्त कधी मिळणार)

ज्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणत्याही सूचना किंवा अभिप्राय नोंदवले जात नसल्याने आयुक्त हे अंतिम मंजुरी देताना त्याच आधारे देत असतात. त्यामुळे जर अशाप्रकारे अतिरिक्त आयुक्त, खातेप्रमुख व उपायुक्त यांचे अभिप्राय नोंदवले गेले तर आयुक्तांना त्यावर स्वाक्षरी करताना खालच्या अधिकाऱ्यांचे मत जाणून घेऊन पुढील मंजुरी देणे इष्ट ठरेल. त्यामुळेच आयुक्तांनी पुन्हा एकदा परिपत्रक काढून केवळ संशिप्त नावाने स्वाक्षरी करणे किंवा खालच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली म्हणून त्याआधारे मंजुरी दिली जाते अशाप्रकारे केवळ स्वाक्षरी करून आपली जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांना आता प्रत्येक फाईल्स व पेपरवर स्वाक्षरी करताना संबंधित विषयांसंदर्भात सूचना करणे बंधनकारक ठरणार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.