‘डिलिव्हरी बाॅइज’ संबंधित पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय, आता

175

डिलिव्हरी बाॅइजची नियुक्ती करताना, त्यांचा चारित्र्य पडताळणी अहवाल असणे आवश्यक असल्याचं, पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितलं आहे. कुरिअर तसेच, खाद्य पदार्थ पुरवणा-या डिलिव्हरी बाॅइज एखाद्या गुन्ह्यांत सहभागी आढळल्यास, कपंनीलाही जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शनिवारी दिल्या.

तर कंपनी जबाबदारी

डिलिव्हरी बाॅइज विरुद्ध खूप तक्रारी येत असल्याने, बैठक आयोजित करण्यात आली होती. ब्ल्यू डार्ट, अॅमेझाॅन, ओवरसिज, स्विगी, मॅकडोनाल्ड आदी कंपन्यांचे मालक, व्यवस्थापक, प्रतिनीधी असे 30 जण बैठकीला उपस्थित होते. काही प्रकरणांतील डिलिव्हरी बाॅइजकडून लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात नियुक्तीवेळी डिलिव्हरी बाॅइजची चारित्र्य पडताळणी न केल्यास कंपनीस जबाबदार धरण्यात येईल, असे पांडे यांनी सांगितले.

( हेही वाचा अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना कोरोनाची लागण! )

नियम मोडल्यास कारवाई

डिलिव्हरी करणा-या बाॅइजना योग्य ते प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच, कामाबाबतचे करारपत्र व आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, डिलिव्हरी बाॅइज मोटारसायकल खूप वेगाने चालवतात, वाहतुकीचे नियम मोडतात. तसेच, एकत्र एका ठिकाणी उभे राहत, शांतता भंग करतात, असं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता अशा वागणूकीवर कारवाई करण्यात येणार आहे. डिलिव्हरी बाॅइज क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे, आकाराचे सामान घेऊन दुचाकी चालवणार नाहीत, याची संबंधित कंपनीने खबरदारी घ्यावी, असेही आयुक्त पांडे यांनी स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.