जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावर नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. यावेळी गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील, केंद्र सरकार जम्मू काश्मीरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. अमित शाह यांच्या हस्ते, जम्मू काश्मीर पोलिसांच्या चार कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
कर्मचाऱ्यांच्या अतुलनीय शौर्याचा आणि त्यागाचा देशाला अभिमान
हौतात्म्य पत्करलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावर अमित शहा यांनी नियुक्तीपत्रे दिली त्यानंतर अमित शाह यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवादही साधला. जम्मू काश्मीर पोलीस सेवेत या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्य आणि त्यागाचा सर्व देशाला अभिमान आहे, असे अमित शाह म्हणाले. अमित शाह सध्या दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत.
( हेही वाचा : शरद पवार म्हणाले, आता थांबा; अधिवेशनानंतर बघू! )
अनेक ठिकाणी, विविध प्रसंगात, जम्मू-काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यात, या पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतूक केले.
अमित शहांनी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली नियुक्तीपत्रे
Join Our WhatsApp Community