दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता (Disabled students) स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर (Dr. Muralidhar Chandekar) यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा जणांची समिती नियुक्त केली आहे. या समितीला पुढील दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारने (State Govt) दिल्या आहेत. (Differently Abled)
राज्यात दिव्यांग विद्यार्थी (Disabled students) विविध विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करायचे झाल्यास त्याचे स्थान, आवश्यक जमीन, बांधकाम, खर्चाचा अंदाज, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राज्यावर पडणारा आर्थिक भार, विद्यापीठ स्थापनेतील आवर्ती, अनावर्ती खर्चाचा तपशील, विद्यापीठाचे विभाग आणि सर्वसाधारण रचना, विद्यार्थ्यांसाठीच्या रोजगारसंधी, शिक्षण संकल्पना विचारात घेता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (Disabled students) स्वतंत्र विद्यापीठ केल्यास त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिकता येणार नाही. त्यामुळे वेगळेपणाची भावना वाढीस लागण्याची शक्यता असून, या संदर्भात अभ्यास करून अहवाल तयार करायचा आहे. (Differently Abled)
(हेही वाचा – BJP : भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जानेवारीमध्ये)
स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा विचार
स्वतंत्र विद्यापीठाऐवजी पारंपरिक विद्यापीठात स्वतंत्र विभाग केंद्र स्थापन केल्याने पडणाऱ्या गुणात्मक फरकाची तुलनात्मक माहिती, प्रस्तावित विद्यापीठातील अभ्यासक्रम, दिव्यांग विद्यार्थ्यांची वर्गवारी करून त्यासाठीचे अभ्यासक्रम आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे निकष या संदर्भात अहवाल तयार करण्यात येईल. दिव्यांग विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन या संदर्भातील आवश्यक विशिष्ट पद्धती व सोयीसुविधा विचारात घेऊन, त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये सुलभता आणण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यासाठी डॉ. चांदेकर (Dr. Muralidhar Chandekar) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे. (Differently Abled)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community