राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्रशासनाने विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार असल्यामुळे वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास मान्यता देण्यात आली.
अशी होणार मदत!
- घराचे पूर्ण/अंशतः (१५ टक्के) नुकसान झालेल्यांचे कपडे, भांड्याचे नुकसान – 5000 रु. प्रति कुटुंब
- पूर्ण नष्ट झालेले पक्के/कच्चे घर – 1,50,000 रू. प्रति घर
- अंशत: पडझड झालेले (किमान 15 टक्के) पक्के/कच्चे घर – 15,000 रु. प्रति घर
- अंशत: पडझड झालेले (किमान 25 टक्के) पक्क्या/कच्चे घर – 25,000 रु.प्रति घर
- अंशत: पडझड झालेले (किमान 50 टक्के) पक्क्या/कच्चे घर – 50,000 रु.प्रति घर.
- नष्ट झालेल्या झोपडीपैकी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपड्यांना – 15,000 मदत रू. प्रति झोपडी.
(हेही वाचा : पैशाच्या ‘मोहा’पायी ठाकरे सरकारने उठवली चंद्रपूरमधील दारुबंदी !)
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत
- बहुवार्षिक पिके- 50,000 रू. प्रति हेक्टर.
- नारळ झाडासाठी – 250 रू. प्रति झाड.
- सुपारी झाडासाठी – 50 रू. प्रति झाड.
दुकानदार व टपरीधारक
जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्ड धारक आहेत त्यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10,000 रू.पर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल.
मत्स व्यवसायिकांना भरपाई
- बोटींची अंशत: दुरूस्ती – 10,000 रू.
- पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी – 25,000 रू.
- अंशत: बाधित झालेल्या जाळयांच्या दुरूस्तीसाठी – 5000 रू.
- पूर्णत: नष्ट झालेल्या जाळयांसाठी – 5000 रू.
- कुक्कुटपालन शेडसाठी प्रत्यक्ष नुकसान – 5000 रू.
मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 4 लक्ष रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अतिरिक्त 1 लक्ष रुपये इतकी मदत देण्यात येईल.
चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटूंबांना 26.08.2020 च्या शासन निर्णयान्वये मोफत अन्नधान्य व केरोसीन वाटप करण्यास मान्यता देण्यात आली.
Join Our WhatsApp Community