मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयात सुरु असलेल्या जनता दरबारामध्ये तक्रारदाराने थेट विभागीय सहायक आयुक्त महेश पाटील यांनाच अर्वाच्च भाषा वापरत धमकी दिल्याने त्यांच्या विरोधात महापालिकेने भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
( हेही वाचा : क्रॉफर्ड मार्केटचे काम १८ महिन्यांच्या विलंबाने सुरु, खर्च वाढला सुमारे ४८ कोटींनी )
मुंबई महापालिकेच्यावतीने आठवड्याच्या दर शुक्रवारी एफ दक्षिण विभाग कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात येतो. शुक्रवारी २० जानेवारी रोजी सकाळी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारमध्ये तक्रारदारांना बोलावून त्यांच्या तक्रारींचा आढावा विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील हे घेत होते. या जनता दरबारमध्ये तक्रारदार प्रविण शिवराम पवार हे उपस्थित होते. पवार यांनी यापूर्वीही लेखी स्वरूपात त्यांच्या कार्यालयात तक्रारी केल्या होत्या, त्यानुसार पवार हे दुपारी आपल्या तक्रारीबाबत सहायक आयुक्तांसमवेत वाद घालू लागले. त्यावेळी “तुम्ही केलेल्या तकारीच्या अनुषंगाने आम्ही कार्यालयीन पत्राव्दारे तुम्हास उत्तर दिलेले आहे. “असे सहायक आयुक्तांनी सांगितले.
परंतु तकारदार हे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तो पुन्हा पुन्हा कार्यवाही बाबत विचारणा करत होते. त्यानंतर त्यांनी रागाच्या भरात मला उद्देशून शिवीगाळ करून, “तुम्ही मला माहिती दिली नाही, तर तुमच्यावर अॅन्टीकरप्शनचा ट्रॅप लावून तुम्हाला एफ / दक्षिण विभागामध्ये काम करू देणार नाही, व एफ/ दक्षिण विभाग कार्यालयाच्या खालीच तुमचा गेम करून ठार मारेन.” अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली,असे महापालिकेने भोईवाडा पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीच्या निवेदनात म्हटले आहे.
तक्रारदार संतप्त होऊन वागू लागल्याने सहायक आयुक्तांचे स्विय सहाय्यक प्रथमेश राणे आणि सुरक्षा रक्षक ज्ञानदेव राठोड यांनी त्यांना बाजुला करून कार्यालयाच्या बाहेर नेले. जनता दरबाराच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत सार्वजनिक कार्ये पार पाडण्यास तक्रारदार प्रविण पवार यांच्या वर्तणूकीमूळे अटकाव निर्माण झाल्याचे सांगत महेश पाटील यांनी स्थानिक भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
एफ/ दक्षिण महानगरपालीका कार्यालयात येऊन तक्रारदाराने मला त्यांच्या तकारीच्या अनुषंगाने योग्य उत्तर मिळाले नाही म्हणून याचा राग मनात ठेवुन मला शिवीगाळ केली तसेच तुम्ही मला माहिती दिली नाही, तर तुमच्यावर अॅन्टीकरप्शनचा ट्रॅप लावून तुम्हाला एफ / दक्षिण विभागामध्ये काम करू देणार नाही अशी धमकी दिली, तसेच मला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने महेश पाटील यांनी तक्रारदाराच्या विरोधात कायदेशिर तक्रार नोंदवली आहे.
Join Our WhatsApp Community