मोबाईल अ‍ॅपद्वारे करता येणार रिक्षा-टॅक्सी चालकांच्या तक्रारी; मनमानी कारभाराला चाप

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रिक्षा, टॅक्सी तसेच खासगी प्रवासी बस चालकांच्या अरेरावीला लगाम लावण्यासाठी परिवहन विभागाने तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी आणि रिक्षा-टॅक्सी चालकांध्ये कायम वाद होत असतात अशावेळी प्रवाशांच्या तक्रारी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात येणार आहे. या मोबाईल अ‍ॅपमध्ये प्रवाशांना अरेरावी, मनमानी करणाऱ्या चालकाचा आणि त्याच्या वाहनाच्या क्रमांकाचा फोटो पाठवता येणार आहे.

( हेही वाचा : हॉटेलमधील सेवा नि:शुल्कच; Service Tax चा आग्रह केल्यास येथे करा तक्रार)

मोबाईल अ‍ॅपची सुविधा 

अनेकवेळा प्रवासी रिक्षा, टॅक्सीचालक जवळचे भाडे नाकारतात, जादा प्रवासी बसवतात, बेशिस्त वर्तन यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत प्रवासी आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. प्रवाशांनी केलेल्या तक्रारींची आरटीओ (RTO) कार्यालयाकडून त्वरित दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मोबाईल अ‍ॅपची सुविधा २०१७ मध्ये सेवेत होती. परंतु काही तांत्रिक कारणास्तव ही सेवा २०२० मध्ये बंद करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा एकदा मोबाईल अ‍ॅपची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांमध्ये नवे अ‍ॅप प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here