वाई, खंडाळा, महाबळेश्वर मधील प्रलंबित कामे मार्गी लावा; Makarand Jadhav-Patil यांचे निर्देश 

40
वाई, खंडाळा, महाबळेश्वर मधील प्रलंबित कामे मार्गी लावा; Makarand Jadhav-Patil यांचे निर्देश 
  • प्रतिनिधी

वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या भागातील जलसंपदा विभागाशी संबंधित प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील (Makarand Jadhav-Patil) यांनी दिले. पुण्यात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी या प्रकल्पांवरील प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह. वि. गुणाले आणि ह. तु. धुमाळ, तसेच उपविभागीय अधिकारी कचरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – पालकमंत्र्यांची नावे १६ जानेवारीपर्यंत जाहीर होणार; Chandrashekhar Bawankule यांची माहिती)

महत्त्वाची प्रलंबित कामे :

मंत्री मकरंद जाधव-पाटील (Makarand Jadhav-Patil) यांनी खालील प्रकल्पांवर तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या :

कवठे-केंजळ उपसा सिंचन योजना : या योजनेतील अडचणी दूर करून त्वरित पूर्णता देणे.
जांभळी बंधाऱ्याची उंची वाढविणे : प्रकल्पाच्या उंची वाढीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने मार्गी लावणे.
जललक्ष्मी योजना-आकोशी पाणी पुरवठा योजना : पाण्याचा पुरवठा नियमित आणि वंचित भागांपर्यंत पोहोचवणे.
देवघर उपसा सिंचन योजना : खंडाळा तालुक्यातील वंचित १४ गावांना या योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे.
नागेवाडी धरण : भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला प्रलंबित राहू नये, यासाठी तत्काळ कार्यवाही करणे.

(हेही वाचा – Valmik Karad वर अखेर मकोका अंतर्गत कारवाई; सरकारी वकिलाची माहिती)

मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे प्रतिपादन :

मंत्री पाटील (Makarand Jadhav-Patil) म्हणाले की, या प्रकल्पांमुळे जलसिंचन आणि पाणीपुरवठा यामध्ये सुधारणा होईल. या भागातील नागरिकांना पाणीटंचाईपासून मुक्ती मिळेल. सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, तसेच भूसंपादन प्रकरणांतील अडथळे दूर करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपस्थित अधिकाऱ्यांचे आश्वासन :

बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकल्पांवर लवकरच काम सुरू होईल आणि सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत वाई, खंडाळा, आणि महाबळेश्वर भागातील पाणीटंचाई आणि सिंचनविषयक समस्यांवर सकारात्मक निर्णय घेतले गेले असून, त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.