मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश

118

मुंबई- गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करुन जनतेला तातडीने दिलासा द्यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत.

( हेही वाचा : प्रवाशांची होणार गैरसोय! मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांदरम्यान विशेष वाहतूक पॉवर ब्लॉक)

मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा घेतला. यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा क्र. १, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा क्र.२, आदि रस्त्यांची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे बळकटीकरण व चौपदीकरणाच्या कामाच्या सद्यस्थितीच्या कामाबद्दल आढावा घेतला. ही सर्व कामे तांत्रिकदृष्टया कशा पध्दतीने जलदगतीने पूर्ण करण्यात येतील याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाट रस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करुन अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या. या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्यादृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.

परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी २ कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे, तो तात्काळ संबंधितांना वितरीत करण्यात यावा असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.