आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत; मंत्री Nitesh Rane यांचे निर्देश

31
आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत; मंत्री Nitesh Rane यांचे निर्देश
आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत; मंत्री Nitesh Rane यांचे निर्देश

कोकणातील आंबा बागायतींवर मोठ्या प्रमाणात फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या दालनात झालेल्या बैठकीत फुलकिडीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत चर्चा झाली. मंत्री राणे यांनी कृषीमंत्री कोकाटे यांच्या निदर्शनास आणून दिले की, या किडीमुळे कोकणातील आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. बाजारात उपलब्ध असलेली किटकनाशके प्रभावी ठरत नसल्याने किडीच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

(हेही वाचा – Maharashtra Rajya Bharat Scouts And Guides च्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट)

टास्क फोर्स आणि प्रशिक्षण कार्यक्रम

फुलकिड नियंत्रणासाठी स्थापन टास्क फोर्सच्या माध्यमातून कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचनाही मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी दिल्या.

मंत्री राणे यांच्या सूचनांना कृषीमंत्री माणिक कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास दिले. तसेच, फुलकीड नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही कृषी विभागाला देण्यात आल्या.

बागायतदारांना मोठी मदत होणार

या निर्णयामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आंबा निर्यातीसाठी महत्त्वाचा असलेल्या या भागात फुलकिडीमुळे उत्पादन घटत आहे. त्यामुळे शास्त्रशुद्ध कीड व्यवस्थापनासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने समन्वय साधून तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.