विद्यार्थ्यांना हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबवा; शालेय शिक्षणमंत्री Dada Bhuse यांचे निर्देश

जवाहर बालभवनचे नूतनीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

19
विद्यार्थ्यांना हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबवा; शालेय शिक्षणमंत्री Dada Bhuse यांचे निर्देश
  • प्रतिनिधी 

राज्यातील विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिले. चर्नी रोड येथील जवाहर बालभवनचे नूतनीकरण तातडीने पूर्ण करावे आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी-केंद्रित उपक्रम सुरू करावेत, असेही त्यांनी सांगितले.

मंत्रालयात बैठकीत आढावा

शालेय शिक्षणमंत्री भुसे (Dada Bhuse) यांनी मंत्रालयात जवाहर बालभवन नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीला प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे आणि बालभवनच्या संचालक नीता पाटील आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – महामार्गाची अवस्था वाईट असताना टोल वसूल करू नये; High Court चा महत्त्वाचा निर्णय)

बालभवनचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

भुसे (Dada Bhuse) म्हणाले, जवाहर बालभवनला ७३ वर्षांचा प्रदीर्घ वारसा आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

त्यामुळे हे केंद्र अभ्यासक्रमाबाहेरील उपक्रमांसाठी मुंबईतील सर्वात मोठे केंद्र बनावे, असे त्यांनी सांगितले. तसेच, महानगरपालिका शाळांमधील तसेच विविध उपक्रम राबवू न शकणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना येथे विशेष प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सूचित केले.

(हेही वाचा – Crime : टेम्पोतच सासूला मारहाण करून पेटवले; जाळपोळीत सासू आणि जावयाचा मृत्यू)

विद्यार्थ्यांसाठी नव्या सुविधा आणि उपक्रम

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पुढे सांगितले की,

  • बालभवनमध्ये आधुनिक प्रेक्षागृह, तारांगण आणि इतर आकर्षक सुविधा विकसित कराव्यात.
  • विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमासोबतच गायन, नृत्य, खेळ, छंदवर्ग, कार्यशाळा आणि विविध शिबिरे वर्षभर राबवावीत.
  • विद्यार्थ्यांना त्यांची आवड जोपासता यावी आणि अंगभूत कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
बालभवन संचालकांनी दिली माहिती

बालभवनच्या संचालक नीता पाटील यांनी या बैठकीत माहिती दिली की, सध्या बालभवनमध्ये विद्यार्थ्यांसाठी गायन, नृत्य, खेळ, विविध छंदवर्ग आणि कार्यशाळा वर्षभर घेतल्या जातात. हे उपक्रम आणखी प्रभावीपणे राबविण्यासाठी नूतनीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील विद्यार्थी अत्याधुनिक सुविधांसह आपल्या कलागुणांना वाव देऊ शकतील, तसेच शिक्षणासोबत आनंददायी उपक्रमांचा लाभ घेऊ शकतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.