- ऋजुता लुकतुके
कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात ९१ अमेरिकन डॉलर प्रती बॅरलपर्यंत गेल्या आहेत. त्याचा परिणाम अर्थातच भारतातील इंधनाच्या किमतीवर होतो आहे आणि भारतात इंधन महागतं आहे. याचा परिणाम म्हणून देशातील एचपीसीएल, बीपीसीएल, इंडियन ऑईल या कंपन्यांचे शेअर मागच्या वर्षभरात तब्बल ११२ टक्क्यांनी वाढले आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून त्यात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. (Confidence Petroleum Share Price)
तेल कंपन्यांच्या किमतीवर होणारा परिणाम हा शेअरच्या किमतीवर थेट होत असतो. त्यामुळे शेअरवर परिणाम करणारे पाच घटक बघूया, (Confidence Petroleum Share Price)
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती
भारतात आपण गरजेच्या ८० टक्के तेल बाहेरून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्या की तेल कंपन्यांचा आयातीवरील खर्च वाढतो. फेब्रुवारी महिन्यात ७१ डॉलर प्रती बॅरल असलेल्या किमती आता ९१ डॉलरवर गेल्या आहेत. त्यामुळे इंधन महागतं. पण, तेल कंपन्यांना भारतीय बाजारातही किंमत वाढून मिळते. त्यांचं नफ्याचं गणित एकदम वाढून फायदाही वाढतो. त्याचा परिणाम शेअरच्या किमती वाढण्यात होतो. तेच तेल कंपन्यांच्या बाबतीत मागच्या वर्षभरात झालंय. (Confidence Petroleum Share Price)
(हेही वाचा – काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन; Ravindra Chavan यांची माहिती)
तेल कंपन्या सरकारी
देशातील रिलायन्स सारखा मोठा अपवाद सोडला तर इतर तेल कंपन्या या सरकारी आहेत. सरकारी कंपन्यांना नफा झाला तर त्यांचा लाभांशही तगडा असतो. सरकारी कंपन्यांचे शेअर भारतात लाभांशासाठीच ओळखले जातात आणि लाभांशाच्या अपेक्षेनं या शेअरमध्ये गुंतवणूकही मोठी होते. (Confidence Petroleum Share Price)
इंधनाच्या विपणनाची किंमत
तेलाच्या किंवा इंधनाच्या किमती वाढल्या तरी कंपन्यांना विपणनाची मार्जिन फारशी नाही. कारण, इंधनाचे म्हणजे पेट्रोल, डिझेलचे दर सरकार ठरवतं. अशावेळी कंपन्यांना विपणन आणि शुद्धीकरणाची जी किंमत मोजावी लागते त्या मार्जिनवरूनही तेल कंपन्यांचा नफा ठरतो. तो जास्त असेल तर शेअरना मागणी जास्त असते. (Confidence Petroleum Share Price)
तेलाची साठवणूक
कच्च्या तेलाचं जमिनीतून उत्खनन होतं. पण, इंधन वाहतं रहावं लागतं. ते साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची मागणी जरा जरी कमी झाली तरी पुरवठ्यावर परिणाम होतो. तेलाच्या किमती इतर वस्तूंच्या तुलनेत झपकन उतरतात. त्यामुळे किमतीतील उतार चढावही मोठ्या प्रमाणावर असतात. त्याचा परिणाम कंपनीच्या उत्पादन खर्चावर होत असतो. शेअरची किंमतही त्यावर ठरते. (Confidence Petroleum Share Price)
देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक
तेलाच्या किमतीवर देशांतर्गत गुंतवणूकदार आणि परकीय संस्थागत गुंतवणूकदारांचं बारकाईने लक्ष असतं. त्यांच्याकडे शेअरची किमत वर-खाली करण्याचं सामर्थ्यही असतं. देशाची अर्थव्यवस्था सकस असेल तर अशा संस्थागत गुंतवणूकदारांची संख्या वाढते. पर्यायाने शेअरची किंमत वाढते. (Confidence Petroleum Share Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community