Mumbai Pune Expressway वर वाहनचालकांची कोंडी; अपघातही आणि दंडही

369

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Expressway) घाट परिसरात वेग मर्यादा दर्शविणारे फलक मोजक्याच ठिकाणी बसविल्याने चालकांना वाहनाचा वेग अचानकपणे कमी करावा लागत आहे; मात्र मागून आलेल्या वाहनांच्या वेगावर आवर घालणे मुश्किल होते, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच वाहन चालकांना वाहतूक नियमभंग केल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Expressway) हलक्या वाहनांसाठी वेग मर्यादा 100 किमी प्रतितास, तर इतर वाहनांसाठी 80 किलो मीटर प्रतितास आहे; मात्र भरधाव जाणार्‍या वाहनचालकांना घाट परिसरात अचानकपणे प्रतितास 60/40 ची वेग मर्यादा असल्याचे फलक दिसल्याने वाहनांवर नियंत्रण आणणे कठीण होते. वेग कमी केल्यास मागून आलेली वाहने धडकण्याचे प्रकार घडत आहेत; तसेच वाहनांचा वेग कमी न केल्यास वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याने नाईलाजास्तव दोन हजार रूपये दंड भरावा लागत आहे. द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) वेग मर्यादेबाबतचे फलक अगदी कॅमेराजवळ तसेच मोजक्याच ठिकाणी लावल्याने वाहन चालकांना याचा अंदाज येत नाही. परिणामी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने वाहन चालकांना दंड भरावा लागत आहे. त्यामुळे द्रुतगतीवरील घाट परिसरात जागोजागी वेग मर्यादेबाबत सूचना फलक आणि डिजिटल बोर्ड लावण्यात यावेत अशी मागणी चालकांकडून करण्यात येत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.