हरियाणा विधानसभा (Haryana Election Result 2024) निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीला काँग्रेसने (Congress) आघाडी घेतली होती; परंतु, नंतर काही तासांत भाजपने आघाडी घेत तब्बल 48 जागा पटकावल्या. यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाची वेबसाईट संथ असून निकाल अपडेट करण्यास उशीर करीत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने (Election Commission) काँग्रेसचे आरोप तथ्यहीन आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे.
(हेही वाचा – Maharashtra Bhavan : अयोध्येत महाराष्ट्र भवन, मंत्री रवींद्र चव्हाणांसह मान्यवरांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन)
हरियाणा मतमोजणीचे चित्र पालटल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकालाचे अपडेट करण्यास उशीर होत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोग अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांच्या या आरोपांना मिनिट-टू-मिनिट डेटा अपडेटसह प्रत्युत्तर दिले. ईसीआयने म्हटले आहे की, ‘लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार होते त्या दिवशी 4 जून रोजी देखील काँग्रेसने (Congress) असेच आरोप केले होते. आयोगाला हे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे आढळून आले आणि निवडणूक आचार नियमांच्या नियम 60 अन्वये पूर्वनिर्धारित मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होते, असे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी मतमोजणीवर सतत लक्ष ठेवतात.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हरियाणा निवडणूक निकालाचा डेटा अपडेट करण्यात विलंब केल्याच्या आरोपावरून आयोगाने सांगितले की, कायदेशीर तरतुदींनुसार, प्रत्येक जागेवर पडलेल्या मतांची मोजणी तेथे निवडणूक लढविणारे उमेदवार आणि पक्षांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत केली जाते. डेटा अपडेट करण्यात उशीर झाल्याच्या निराधार आरोपांबाबत आम्हाला कोणताही पुरावा सापडलेला नाही.
जयराम रमेश (Jairam Ramesh) यांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला. हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल प्रत्येक 5 मिनिटांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) वेबसाइटवर अपडेट केले जात होते. मतमोजणीच्या सुमारे 25 फेऱ्या झाल्या आणि मतमोजणीची प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यानंतर पाच मिनिटांत डेटा वेबसाइटवर अपलोड झाला. जयराम रमेश यांचे आरोप बेजबाबदार, तथ्यहीन असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने फेटाळून लावले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community