कर्नाटकातील (Karnataka) काँग्रेस सरकारने कुंदापूर, उडुपी येथील शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य बी.जी. रामकृष्ण यांना जाहीर केलेला ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ रोखून धरला आहे. प्राचार्य बी.जी. रामकृष्ण यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर SDPI या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या राजकीय संघटनेने थयथयाट केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने ५ सप्टेंबर रोजी झालेल्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने 41 शिक्षक, मुख्याध्यापक आणि व्याख्याते यांना शिक्षक दिनानिमित्त ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक / प्राचार्य पुरस्कार’ घोषित केला आहे.
(हेही वाचा – Ajit Pawar : “अजित पवारांचा संघाविषयीचा निर्णय : युतीमध्ये वाढणाऱ्या तणावाचा संकेत?”)
डिसेंबर 2021 मध्ये उडुपी येथील सरकारी महाविद्यालयात हिजाब घालून येण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये हिजाब (hijab ban) परिधान करून महाविद्यालयात आलेल्या 28 विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. हा विषय कर्नाटक उच्च न्यायालयात गेल्यानंतर ‘हिजाब ही इस्लामिक श्रद्धेची अत्यावश्यक प्रथा नाही’, असे सांगून मुसलमान विद्यार्थिनींच्या याचिका फेटाळल्या होत्या. त्या काळात महाविद्यालयात बी.जी. रामकृष्ण हे प्राचार्य होते. त्यामुळे तेव्हाच्या हिजाबबंदीच्या निर्णयाच्या आकसातून समाजवादी पक्षाने त्यांना पुरस्कार मिळण्यापासून रोखले आहे.
शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनीही SDPI ची ‘री’ ओढली आहे. “मला वाटते की रामकृष्ण यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची देखरेख करणाऱ्या समितीने एका विशिष्ट समस्येकडे दुर्लक्ष केले. काल ही समस्या उघडकीस आल्यानंतर आम्ही हा पुरस्कार तात्पुरता स्थगित केला आहे. आम्ही परिस्थिती स्पष्ट करू आणि अद्ययावत माहिती देऊ. मी त्यांना पुन्हा मूल्यमापन करण्याचे आणि नंतर आमच्याकडे परत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. ते विद्यार्थ्यांशी कसे वागले, ही चिंतेची बाब आहे “, असे मधु बंगारप्पा म्हणाले.
दरम्यान, हा पुरस्कार मागे घेण्यात आलेला नाही. ‘तांत्रिक समस्यांमुळे’ याला विलंब होऊ शकतो, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community