अयोध्येत राम मंदिर बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर २२ जानेवारीला होणाऱ्या प्रतिष्ठापन सोहळ्याला उपस्थित राहण्यास अजिबात संकोच करू नये, असे मत (Congress leader Karan Singh) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंग यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्षाने या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिल्यानंतर करण सिंग यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला घरचा आहेर मिळाला आहे.
नेमकं काय म्हणाले करण सिंग ?
मी स्वतः राम मंदिरासाठी ११ लाख रुपयांची देणगी दिली होती. आता मला या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देखील मिळाले आहे. मात्र माझ्या तब्येतीच्या कारणांमुळे मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही. मात्र जम्मूमधील प्रसिद्ध रामाच्या मंदिरात आम्ही मोठा उत्सव साजरा करणार आहोत. पुढे बोलतांना सिंग म्हणाले की; “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तुम्हाला कोणत्याही समारंभाचे निमंत्रण देण्यात आले असेल तर त्यात सहभागी होण्यास अजिबात संकोच करू नये.” (Congress leader Karan Singh)
(हेही वाचा – Milind Deora : काँग्रेस नेते देवरा यांचा आज शिवसेना प्रवेश)
काँग्रेस पक्षाने मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण फेटाळले –
तर दुसरीकडे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी राममंदिराच्या प्रतिष्ठापन सोहळ्याला हजर राहण्याचे निमंत्रण नाकारले आहे. भाजप या मंदिराला आपला राजकीय प्रकल्प बनवत असल्याचे कारण देत त्यांनी हे निमंत्रण नाकारले आहे. तसेच आमच्या नेत्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते मंदिराला भेट देऊ शकतात असे त्यांनी सांगितले. (Congress leader Karan Singh)
(हेही वाचा – Bhujbal Family Bank Notice : नाशिक जिल्हा बँकेकडून भुजबळ कुटुंबाला कर्ज वसुलीची नोटीस)
पक्षाने मंदिरावर भूमिका घ्यायला नको होती – अर्जुन मोढवाडिया
करण सिंग (Congress leader Karan Singh) प्रमाणेच गुजरात काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनी देखील पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ‘पक्षाने राम मंदिरावर भूमिका घ्यायला नको होती.’ असं म्हणत त्यांनी “भगवान श्रीराम हे आदरणीय देव आहेत. देशवासियांसाठी ही श्रद्धेची बाब आहे. काँग्रेस पक्षाने असे राजकीय निर्णय घेण्यापासून दूर राहायला हवे होते “, असे त्यांनी ‘एक्स” वरील एका पोस्टमध्ये लिहले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community