वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या (Waqf Amendment Bill 2024) विरोधासाठी मुर्शिदाबादमध्ये (murshidabad violence) सुरु असलेल्या हिंसाचाराचे काँग्रेस नेते राशिद अल्वी (Rashid Alvi) यांनी समर्थन केले आहे. भाजपवर या हिंसाचाराचे खापर फोडत असतांना ‘जेव्हा एखाद्या समुदायाला वाटते की, त्याच्या धर्मावर हल्ला होत आहे, तेव्हा तो प्रतिक्रिया देतो’, अशा शब्दांत या हिंसाचाराचे समर्थन केले आहे.
(हेही वाचा – Murshidabad Violence : पश्चिम बंगालसारखा हिंसाचार देशाच्या अन्य राज्यातही भडकण्याची शक्यता; केंद्र सरकार अलर्ट मोडवर)
कुठेही हिंसाचार होता कामा नये; पण शांततामय आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास कोण जबाबदार आहे? भाजप (BJP) सरकार आणि पंतप्रधान मुसलमानाविषयी इतका द्वेष बाळगत रहातील का ? हा कायदा मुसलमानांच्या धर्मात घुसखोरी करण्यापेक्षा कमी नाही, अशा शब्दांत काँग्रेस (Congress) नेते राशिद अल्वी यांनी मुर्शिदाबाद येथील हिंसाचाराचे खापर भाजपवर फोडले आहे.
मुर्शिदाबाद येथील मुसलमानांकडून सुरु असलेल्या हिंसाचाराचे समर्थन करतांना राशिद अल्वी (Rashid Alvi) पुढे म्हणाले की, जेव्हा एखाद्या समुदायाला वाटते की, त्याच्या धर्मावर हल्ला होत आहे, तेव्हा तो प्रतिक्रिया देतो. अशा घटनांचे परिणाम आपण पाहिले आहेत. मग ते सुवर्ण मंदिरावरील हल्ला असो, डेन्मार्कमधील व्यंगचित्रावरून झालेला वाद असो किंवा सलमान रश्दी यांच्याविरोधातील प्रतिक्रिया असो. मी शांततेसाठी आवाहन करतो, परंतु या अशांततेसाठी मी भाजप सरकारला जबाबदार धरतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community