Congress MLA Arrested : आसाममध्ये आमदाराला अटक; हिंदूंविषयी केली होती ‘ही’ आक्षेपार्ह विधाने

123
Congress MLA Arrested : आसाममध्ये आमदाराला अटक; हिंदूंविषयी केली होती 'ही' आक्षेपार्ह विधाने

आसाम पोलिसांनी हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदाराला 7 नोव्हेंबर रोजी गुवहाटी येथून अटक केली आहे. (Congress MLA Arrested) काँग्रेसचा आमदार आफताब उद्दीन मोल्ला असे अटक करण्यात आलेल्या आमदाराचे नाव आहे. त्याने हिंदू समाजाबरोबरच हिंदू मंदिरांबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. आमदार वाजेद अली चौधरी यांच्या निवासस्थानी असताना आफताब यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आफताब यांनी हिंदू समाजाविरोधात विधाने केली होती. आफताब यांनी गोलपारा येथील एका जाहीर सभेमध्ये केलेल्या विधानावरून त्यांना अटक झाली आहे.

(हेही वाचा – Glenn Maxwell Carnage : एकदिवसीय क्रिकेटमधील अविस्मरणीय खेळीनंतर खुद्द मॅक्सवेलची प्रतिक्रिया काय होती? )

गोलपारा जिल्ह्यातील जलेश्वर येथे 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आफताब उद्दीन मोल्ला यांनी हिंदू मंदिरे आणि नामघरींचे पुजारी (‘नामघर’ या प्रार्थनागृहाचे सदस्य) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. (Congress MLA Arrested)

म्हणे, मंदिराचे पुजारी बलात्कारात सहभागी 

‘वैष्णव संतांचे विचार बलात्काराच्या घटनांमध्ये गुंतलेले आहेत. जेव्हा जेव्हा बलात्कार होतो, तेव्हा त्यात मंदिराचा पुजारी किंवा नामघरी सामील असल्याचे दिसून येते. कोणताही मुस्लिम आलम किंवा इमाम असे कृत्य करत नाही. जर कोणी तसे केले असेल, तर संबंधित पुरावे सादर करावे लागतील. समाजात व्यभिचार किंवा वाईट कृत्ये होत असतील, तर ते हिंदू लोक करतात. तसे मुस्लिम करत नाहीत’, अशी बेताल विधाने आमदार आफताब उद्दीन मोल्ला यांनी केली आहेत.

आफताबुद्दीन मोल्ला यांच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. भेटापारा येथील दीपककुमार दास नावाच्या व्यक्तीने मंगळवारी शहर पूर्व पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर दिसपूर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हिंदू धर्माविरोधात अशी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भूपेन बोराह यांनी आमदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. (Congress MLA Arrested)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.