सहारनपूरचे काँग्रेस (Congress) खासदार इम्रान मसूद (Imran Masood) यांनी पुन्हा एकदा औवेसींप्रमाणे धमकी देणारे विधान केले आहे. मसूद म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यावर एका तासात सर्व गोष्टींवर उपचार करू, असे ते म्हणाले. वक्फ विधेयकासंदर्भात त्यांनी हे विधामन हैदराबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
( हेही वाचा : कर्करोग्यांसाठी असलेली इमारत पाडली; Bombay High Court संतापले; BMC वर केली ‘ही’ कारवाई)
वक्फ कायद्याबद्दल बोलताना इम्रान मसूद (Imran Masood) म्हणाले की, आम्हाला आमच्या पद्धतीने कसे वागवायचे हे माहित आहे. यावेळी इम्रान मसूद यांनी असा दावाही केला की, वक्फ कायदा लागू झाल्यानंतर मशिदी राहणार नाहीत. त्यांनी विचारले की जर मशिदी नसतील तर मुस्लिम नमाज कुठे अदा करतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
इम्रान मसूद यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे तुकडे- तुकडे करण्याची धमकी दिली होती. हैदराबादमध्ये एआयएमआयएमचे (AIMIM ) आमदार अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनीही अशीच धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की जर १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवले तर आम्ही दाखवून देऊ की हिंदू (Hindu) अधिक शक्तिशाली आहेत की मुस्लिम. त्यातच आता सत्तेत आल्यावर सर्व गोष्टींवर उपचार करू, असे विधान मसूद यांनी केले आहे. (Imran Masood)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community