लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाची घटलेली संख्या लक्षात घेता विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सक्रिय झाले आहेत. यामुळेच प्रथमच काँग्रेसच्या (Congress) खासदारांना अधिक सक्रिय करण्यासाठी त्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारला घेरण्यासाठी त्यांनी पक्षाच्या खासदारांना खास आदेश दिले आहेत. लोकांचे प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यासाठी राहुल गांधी यांनी पक्षाच्या खासदारांची नुकतीच एक बैठक घेतली होती. त्यात राहुल गांधी यांनी लोकांच्या समस्या उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याची योजना आखली आहे. खासदारांनी कोणकोणते मुद्दे उचलायचे, याचीही माहिती देण्यात आली आहे.
कसे होणार मूल्यमापन ?
या बैठकीत पक्षाच्या खासदारांना त्यांच्या राज्याच्या आणि परिसरातील समस्यांसह हे मुद्दे संसदेत ठळकपणे मांडण्याचा सल्ला देण्यात आला आणि ते म्हणाले की, लोकसभेत प्रश्न उपस्थित करणाऱ्या सदस्यांच्या सक्रियतेचे मूल्यांकन केले जाईल. लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्व लोकसभा खासदारांची ही बैठक बोलावली होती.
खासदार सभागृहात किती उपस्थित राहतात ? कोणते प्रश्न विचारतात ? कसे विचारतात ? विषयाचा अभ्यास करतात की नाही ? अशा विविध मुद्यांना धरून खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जाणार आहे. खरं म्हणजे, रिपोर्ट कार्ड तयार करण्याची काँग्रेसची पद्धत नाही. फक्त पक्षाच्या कामाशी संबंधित एखादा मुद्दा सभागृहात चर्चेला असेल तेव्हाच खासदारांना सूचना दिल्या जातात. या व्यतिरिक्त ते काय करतात? कोणते प्रश्न विचारतात? याकडे लक्ष दिले जात नाही. ही पद्धत भाजपमध्ये आधी पासून आहे.
हेही पहा –