केरळमधील कोझिकोडमध्ये पॅलेस्टाईनच्या (israel hamas war) समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. (Congress Support Palestine) गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या केरळचे दोन मोठे नेते केसी वेणुगोपाल आणि शशी थरूर सहभागी झाले होते. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने (KPCC) ही रॅली पुकारली होती. त्यात या रॅलीत प्रदेश काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
(हेही वाचा – Kerala : गेल्या काही दशकांत केरळमधील हिंसाचारात वाढ)
पॅलेस्टाईनला नेहमीच पाठिंबा – केसी वेणुगोपाल
या रॅलीला संबोधित करतांना काँग्रेसचे राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने इस्रायलच्या हल्ल्याला नेहमीच विरोध केला. पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर काँग्रेसची तीच भूमिका आहे. पॅलेस्टाईनच्या भूमीसाठीच्या लढ्याला आम्ही नेहमीच पाठिंबा दिला; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर सरकारने आपली भूमिका बदलली. (Kerala Pradesh Congress Committee)
याआधीही केरळमधील सत्ताधारी सीपीएम, इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) आणि इतर अनेक पक्षांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढल्या आहेत.
(हेही वाचा – Hamas Support Rally in Kerala : केरळचा होतोय काश्मीर…)
भाजप आपले परराष्ट्र धोरण जनसंपर्क म्हणून वापरते – काँग्रेस नेते
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये (United Nations) विविध देशांनी ठराव आणला होता. यातील मतदानादरम्यान भारत गैरहजर राहिला. हे योग्य नव्हते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील जनतेचा अपमान झाला आहे, असा आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community